बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान याच्या मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर गोळीबार झाला होता. १४ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. त्यानंतर मुंबई गुन्हे तातडीने तपास करत दोन्ही आरोपींना गुजरातमधून अटक केली होती. या घटनेनंतर खान कुटुंबातील सदस्याने म्हणजेच अरबाज खानने १५ एप्रिलला सोशल मीडियावर याबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. अशातच आता अर्पिता भावासाठी निजामुद्दीन दर्ग्यात पोहोचली आहे.
सलमान खानची बहिण अर्पिता खान हिने निजामुद्दीन दर्ग्याला भेट दिली. जरी दर्ग्याला जाण्याचं कारण अज्ञात तरी आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि भावाच्या सुरक्षेसाठी तिने या पवित्र स्थानाला भेट दिली असावी अशी चर्चा सध्या सुरू आहे.
हेही वाचा… सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर आयुष शर्माचं विधान; म्हणाला, “हा काळ आमच्यासाठी…”
निजामुद्दीन दर्ग्याला भेट देतानाचे अर्पिता खानचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
या खास दिवसासाठी अर्पिताने फ्लोरल प्रिंटेड ड्रेस परिधान केला होता आणि तिने तिच्या डोक्यावर ओढणी घेतली होती. या पवित्र स्थानी भेट देण्यासाठी अर्पिता तिचा मुलगा आहिल शर्मासह आली होती. दरम्यान, अनेक चाहत्यांनी तिचे फोटोजदेखील काढले.
सलमान खानच्या घरावर हल्ला झाल्याच्या एका आठवड्यानंतर अर्पिता खानचा पती आयुष शर्माने या घटनेबद्दल भाष्य केलं आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जेव्हा या घटनेबाबत त्याला विचारण्यात आलं तेव्हा एएनआयला सांगताना तो म्हणाला , “या कठीण काळात आम्ही सर्व एक कुटुंब म्हणून एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.”
हेही वाचा… “मला रोज फोन करतायत”, केदार शिंदे करतात निलेश साबळेला दररोज फोन, म्हणाला…
दरम्यान, रविवारी (१४ एप्रिलला) गोळीबाराची घटना घडली, त्यानंतर चार दिवसांनी सलमान खान गुरुवारी दुबईला रवाना झाला. एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी तो दुबईला गेला असून अजूनही तिथेच आहे. तिथून माघारी परतल्यावर तो त्याच्या शूटिंगचं कामं करेल, असं म्हटलं जातंय.