हिंदी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन ठरलेला ‘शोले’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या अत्यंत जवळचा आहे. पहिल्यांदा प्रदर्शित होऊन फ्लॉप झाल्यानंतर पुन्हा त्यात काही बदल करून प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ने त्यावेळी सगळे रेकॉर्ड मोडीत काढले होते. सलीम खान व जावेद अख्तर म्हणजेच सलीम-जावेद या सुप्रसिद्ध लेखक जोडगोळीने या चित्रपटाचं लेखन केलं होतं. या चित्रपटाने इंडस्ट्रीला बऱ्याच गोष्टी दिल्या अन् त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे बॉलिवूडचा अजरामर व्हिलन गब्बर सिंग जो साकारला अमजद खान यांनी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
१९६३ साली एका युथ फेस्टिव्हलच्या नाटकातून अमजद खान हे नाव सलीम-जावेद यांच्यासमोर आलं अन् मग या भूमिकेसाठी सलीम-जावेद यांनी अमजद खान यांचं नाव रमेश सिप्पी यांना सुचवलं होतं, परंतु तुम्हाला ठाऊक आहे का की याच सलीम-जावेद जोडीने काही कारणास्तव अमजद यांना चित्रपटातून काढून टाकण्याचाही सल्ला दिला होता. यामुळे नंतर भविष्यात कधीच सलीम-जावेद यांच्याबरोबर अमजद खान यांनी कधीच काम केलं नाही.
आणखी वाचा : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’तील जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांचे कपडे कोण डिझाईन करतं? जाणून घ्या
प्रसिद्ध समीक्षक अनुपमा चोप्रा हिने तिच्या ‘मेकिंग ऑफ क्लासिक’ या चित्रपटात याबद्दल माहिती दिली आहे. जेव्हा ‘शोले’साठी रमेश सिप्पी यांनी अमजद खान यांना नक्की केलं त्यावेळी अमजद यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही अडचणी होत्या. त्यावेळी अमजद यांचा मुलगा काही महिन्यांचाच होता त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं भाग होतं अन् अमजद यांचे वडील कर्करोगावरील उपचार घेत होते. अशा काळात ‘शोले’ हा चित्रपट अमजद यांच्या सगळ्या अडचणी दूर करणारा ठरणार होता.
इंडस्ट्रीतील कित्येक लोकांना डावलून या भूमिकेसाठी अमजद यांना घेण्यात आलं असल्याने ते दडपण त्यांच्या अभिनयात जाणवत होतं, त्यावेळी चित्रीकरणादरम्यान अमजद यांना दोन दिवस काहीच सुचत नव्हतं. त्यावेळी रमेश सिप्पी यांनी अमजद यांना काही काळासाठी ब्रेक घ्यायला सांगितलं व पुढील शेड्यूलमध्ये त्यांचं चित्रीकरण करायचं ठरवलं. पहिल्या शेडयूलमध्ये अमजद यांनी एकही सीन किंवा शॉट दिला नसल्याने टीममधील बऱ्याच लोकांचा अमजद यांच्यावर फारसा विश्वास नव्हता. या भूमिकेला ते कितपत न्याय देऊ शकतील याबद्दल बरेच लोक साशंक होते.
त्यावेळी चित्रपटाच्या युनिटमध्ये याबद्दल खुसफूस सुरू झाली होती अन् अमजद यांना भूमिका देण्याचं खापर आपल्यावर फुटेल अशी भीती सलीम-जावेद या दोघांना वाटत होती. त्यावेळी सलीम-जावेद यांनी रमेश सिप्पी यांची भेट घेतली व त्यांना सांगितलं की, “जर अमजद तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसेल तर त्याऐवजी दूसरा पर्याय बघा.” परंतु रमेश सिप्पी यांनी अमजदबरोबरच काम करायचं असल्याने त्यांनी तो निर्णय बदलला नाही. जेव्हा ही गोष्ट अमजद खान यांच्या कानावर आली तेव्हा त्यांना फार वाईट वाटलं. आपल्याला चित्रपटातून काढू पाहणाऱ्या सलीम-जावेद यांच्या वर्तणूकीमुळे अमजद फार दुखावले गेले. यामुळे नंतर कधीच अमजद खान यांनी सलीम-जावेद जोडीबरोबर काम केले नाही. अमजद यांचं वयाच्या ४८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले पण त्यांनी साकारलेला ‘गब्बर’ अजरामर आहे आणि राहील.