बॉलीवूडची ड्राम क्वीन अभिनेत्री राखी सावंत ही नेहमी चर्चेचा विषय असते. आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टींबाबत ती आपलं मत मांडत असते. अलीकडेच तिनं टोमॅटो महागल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. “टोमॅटो ही काय महाग करण्याची गोष्ट आहे का? आता मी टोमॅटोची चटणी कशी बनवणार? माझं सॅलेड कसं बनवणार,” असं राखी सावंत म्हणाली होती. त्यानंतर आता तिनं थेट टोमॅटोचं झाडचं लावलं आहे. सध्या राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर राखीचा हा शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत राखी म्हणते की, “मित्रांनो, मी आता टोमॅटोचं झाड लावतं आहे.” त्यावेळेस पापाराझी तिला विचारतात की, ‘किती दिवसांत झाडाला टोमॅटो येतील?” तेव्हा राखी तिच्याबरोबर असलेल्या माळीला हाच प्रश्न विचारते. त्यावेळी तो माळी १५ दिवसांत या झाडाला टोमॅटो येतील, असं सांगताना दिसतं आहे.

हेही वाचा – फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ चित्रपटाला ग्रहण; कतरिना, प्रियांका चोप्रानंतर अनुष्का बाहेर, कारण….

हेही वाचा – विद्या बालनचं पहिलं मानधन माहितीये? मिळाला होता ‘इतक्या’ रुपयांचा चेक

दुसऱ्या व्हिडीओमध्ये राखी म्हणते की, “मी कोणी क्रांतीकारी नाही. मी टोमॅटोकारी आहे. मी स्वतः आज टोमॅटोचं झाड लावलं आहे. १५ दिवसांत झाडाला टोमॅटो येतील. माझ्याबरोबर जे माळी होते, त्यांनी मला सांगितलं. त्यामुळे आता झाडाला एवढे टोमॅटो येतील की, पुढच्या सात जन्मापर्यंत ते माझ्या उपयोगी येतील.”

हेही वाचा – “मला तरी कुठे मिळालंय पारितोषिक?” केदार शिंदेंनी ‘ती’च्यासाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत; म्हणाले, “तिची निवड झाली नाही तर…”

दरम्यान, यापूर्वी राखीचा भर पावसात डोक्यावर अंडी फोडून घेतानाचा व्हिडीओ चर्चेत आला होता. चांगला पती मिळण्यासाठी राखीनं हे कृत्य केलं होतं. पण नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं. शिवाय राखीची तुलना उर्फीशी केली होती.