गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री तमन्ना भाटिया व अभिनेता विजय वर्मा यांच्या नात्याची बी-टाउनमध्ये चर्चा होती. अखेर तमन्नाने विजयबरोबरच्या तिच्या रिलेशनशिपची कबुली दिली. आता विजयनेही त्याच्या खूप प्रेम आहे आणि त्याबद्दल तो खूप आनंदी आहे असं म्हटलंय. विजय व तमन्ना लवकरच ‘लस्ट स्टोरी २’ मध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – विजय वर्माशी अफेयरच्या चर्चांवर तमन्ना भाटियाने मौन सोडलं; म्हणाली, “मला मनापासून…”

जेनिस सिक्वेराच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विजयला त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील आवडत्या गोष्टींबद्दल विचारण्यात आलं होतं. त्याचं विजयने उत्तर दिलं. “तुम्ही योग्य वेळ आल्यावर त्याबद्दल बोलता पण मी तुम्हाला सांगू शकतो की माझ्या आयुष्यात सध्या खूप प्रेम आहे मी आनंदी आहे,” असं तो म्हणाला. लोकांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा कामाबद्दल जास्त बोलावं, असं मतही विजयने मांडलं.

हेही वाचा – “आता फक्त आठवणीतच…”, शशांक केतकरचा वडिलोपार्जित वाडा पाडला जाणार; म्हणाला, “एका घराऐवजी…”

दरम्यान, ‘फिल्म कम्पॅनियन’शी बोलताना तमन्ना भाटियाने विजयबरोबरच्या नात्याची कबुली दिली. “विजय वर्माशी माझं आपोआप खूप छान बाँडिंग झालं. आयुष्यात खूप मेहनत करून यशस्वी झालेल्या महिलांची एक समस्या असते, ती म्हणजे आम्हाला वाटतं की प्रत्येक गोष्टीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. पण काही गोष्टी सहज मिळाल्या की तुम्हाला प्रत्येक वेळी मेहनत करण्याची गरज नाही, हे लक्षात येतं. मैत्री खूप मोठी गोष्ट आहे कारण, एका मित्राबरोबरच तुम्हीही किती जोरात असू शकता, एखाद्या प्राण्यासारख्या आवाजातही तुम्ही कोणताही विचार न करता हसू शकता. विजय वर्माची मला मनापासून काळजी वाटते. तो माझं हॅप्पी प्लेस आहे,” असं ती म्हणाली होती.