बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान सध्या चर्चेत आहे. तब्बल ४ वर्षांनी त्याचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित झालं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. दहा दिवसांत या चित्रपटाने जगभरात ७२५ कोटी रुपये कमाई केली आहे. तर देशभरात हा चित्रपट ४०० कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. अशातच शाहरुख खानने एक पोस्ट शेअर केली आहे.
शाहरुख खान सोशल मीडियावरदेखील सक्रीय असतो. ask srk नावाचे सेशन तो ट्वीटवर घेत असतो. नुकताच त्यांनी एक स्वतःचा फोटो शेअर केला आहे. ज्याला कॅप्शन दिला आहे, “सूर्य एकटा आहे तो जळत असतो …..आणि अंधारातून पुन्हा प्रकाशात येतो… सूर्याचा प्रकाश पठाणवर पडतोय हे तुमच्या आशीर्वादामुळे तुमचे आभार.” अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे.
‘पठाण’ चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक नवे विक्रम रचले आहेत. हिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या मते ‘पठाण’ने आता आतापर्यंत हजारहून अधिक कोटी कमावले आहेत. ‘पठाण’ने आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटालासुद्धा मागे टाकलं आहे. दंगलचा ३८७ कोटी कमाईचा रेकॉर्ड ‘पठाण’ने मोडला आहे.
दरम्यान, शाहरुख खान, दीपिका पदुकोण व जॉन अब्राहम यांच्या भूमिका असलेला ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. प्रदर्शनाच्या १५ दिवसानंतरही चित्रपट चांगली कमाई करत आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘बॉलिवूड लाइफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, २५ एप्रिलला ‘पठाण’ ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.