बॉलीवूडचे अनेक कलाकार आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी किंवा इतर खास दिवसासाठी मालदीवला जातात. त्याचप्रमाणे अभिनेत्री बिपाशा बासू देखील ७ जानेवारीला तिचा ४५वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला गेली होती. यावेळी तिच्याबरोबर पती करण सिंह ग्रोव्हर आणि मुलगी देवी देखील होते. या खास क्षणाचे फोटो बिपाशा व करणने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केले होते. पण यामुळे दोघं खूप ट्रोल झाले; ज्यानंतर बिपाशा व करणने सोशल मीडियावरील मालदीवचे फोटो डिलीट केले आहेत. पण नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’नंतर ‘आई कुठे काय करते’ मालिकेला टक्कर द्यायला देणार आता….; पाहा प्रोमो

अभिनेत्री बिपाशा बासू व अभिनेता करण सिंह ग्रोव्हरने तीन दिवसांपूर्वी मालदीवचे फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये दोघं लाडक्या लेकीबरोबर वेळ घालवताना दिसत होते. पण यावेळी दुसऱ्याबाजूला भारत आणि मालदीवमध्ये राजकीय तणाव निर्माण झाला होता. मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अपमानास्पद टीका केली होती. तसेच काही मंत्र्यांनी भारतीय संस्कृतीला लक्ष्य केलं आणि भारतीयांवर वर्णद्वेषी टीप्पण्या केल्या. त्यामुळे वातावरण तापलं होतं. भारतात बॉयकॉट मालदीव ट्रेंड सुरू होतं. त्यामुळे बिपाशा व करण ट्रोलिंगच्या जाळ्यात अडकले.

एका नेटकऱ्याने त्यांच्यावर फोटोवर लिहिल होतं, “मालदीव सरकारने आपला अपमान केला आणि तुम्ही मालदीवमध्ये आहात. तुम्ही तर देशद्रोही आहात.” तसेच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिल होतं, “सिनेसृष्टी मालदीव बॉयकॉट करत आहे आणि तुम्ही प्रमोशन करत आहात, लाज वाटली पाहिजे.” अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया बिपाशा-करणच्या फोटो आल्या होत्या. त्यामुळे दोघांनी मालदीवचे फोटो डिलीट करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – स्वानंद तेंडुलकरला गौतमी देशपांडेची बदलायची आहे ‘ही’ सवय, म्हणाला, “एक पोत भरून…”

दरम्यान, बिपाशाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती गेले कित्येक वर्ष अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. तिचा शेवटचा चित्रपट २०१८साली प्रदर्शित झाला होता. पण तिचा नवरा अजूनही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. हृतिक रोशनच्या ‘फायटर’ चित्रपटात तो पाहायला मिळणार आहे. २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader