Pathaan First Trailer Release :

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. शाहरुख खानचे चाहते गेले अनेक दिवस या दिवसाची वाट बघत होते. या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच अर्ध्या तासातच याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. आता या ट्रेलरवर अभिनेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दाक्षिणात्य अभिनेता राम चरणने यावर ट्वीट करत शाहरुख खानचे कौतुक केले आहे.

दाक्षिणात्य अभिनेता राम चरण हा तेलगू चित्रपटसृष्टीतला आघाडीचा अभिनेता आहे. नुकताच तो ‘RRR’ चित्रपटात झळकला होता. त्याने ट्वीट करत सांगितले आहे, “पठाण चित्रपटाच्या टीमसाठी खूप खूप शुभेच्छा! शाहरुख सर तुम्हाला याआधी कधी असे अ‍ॅक्शन सीन्स करताना पहिले नाही.” अशा शब्दात त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Pathaan Trailer : “चित्रपट सुपरहिट ठरणार”, शाहरुख-दीपिकाच्या ‘पठाण’चा ट्रेलर पाहून भारावले प्रेक्षक, तासाभरातच मिळाले लाखो व्ह्यूज

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’च्या दोन गाण्यांमध्ये दीपिका व शाहरुखची केमिस्ट्री पाहायला मिळली. आता ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक अगदी भारावून गेले आहेत. ट्रेलरमध्ये शाहरुख व दीपिकाचे अ‍ॅक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत. तसेच जॉन अब्राहमही यामध्ये भलताच भाव खाऊन गेला आहे.

सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. बहुचर्चित ‘पठाण’ २५ जानेवारीला बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कितपत प्रतिसाद मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.