दरवर्षीप्रमाणे यंदाही बाबा सिद्दीकी व झिशान सिद्दीकी यांनी मुंबईत काल, २४ मार्चला ग्रँड इफ्तार पार्टी आयोजित केली होती. या इफ्तार पार्टीला बॉलीवूडसह टेलीव्हिजन इंडस्ट्रीतील कलाकार उपस्थित राहिले होते. सलीम खान, सलमान खान, चंकी पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, विजय वर्मा, अली गोनी, जॅस्मीन भसीन, शेहजान गिल असे अनेक कलाकार मंडळींनी बाबा सिद्दीकी व झिशान सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावली होती. याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. याच इफ्तार पार्टीत हजर राहिलेली एक प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या एका कृतीमुळे चर्चेत आली असून तिला ट्रोल केलं जात आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘बिग बॉस’ फेम हिना खान.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री हिना खान बाबा सिद्दीकी व झिशान सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत सलवार सूट आणि त्यावर गुलाबी रंगाची ओढणी अशा लूकमध्ये पाहायला मिळाली. यावेळी तिला पापाराझींनी फोटो काढण्यासाठी आवाज दिला. तेव्हा हिनाने कान बंद करून खूप ओरड आहात असं दाखवलं. तिच्या याच कृतीमुळे नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. काहीजण तिला “दुसरी जया बच्चन” म्हणत आहेत.

हेही वाचा – Video: बायकोला पाण्याच्या टाकीत बसवलं अन् बेभान…, शाहरुख खानच्या होळी सेलिब्रेशनचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

हिना खानच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “ओव्हर अ‍ॅक्टिंगचे १५० रुपये.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “दुसरी जया बच्चन आहे.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “एवढी ओव्हर अ‍ॅक्टिंग करायची गरज नव्हती.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “नवीन जया बच्चन येत आहे.”

हेही वाचा – “भाई पंड्या तू अजून…”, मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली…

दरम्यान, ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन या नेहमी पापाराझींना टोकताना दिसतात. “मी बहिरी नाही. थोडं हळू आवाजात बोला,” असं एकदा जया बच्चन पापाराझींना म्हणाल्या होत्या. त्यामुळे यावरून नेटकरी हिना खानला दुसरी जया बच्चन म्हणत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After watching viral video netizens say actress hina khan is second jaya bachchan pps