नुपूर शिखरे व आयरा खान यांचं लग्न नोंदणी पद्धतीने झालं. कोणत्याही धार्मिक विधीशिवाय हे जोडपं लग्नबंधनात अडकलं. त्यांच्या लग्नातील फोटो व व्हिडीओ समोर आल्यानंतर नुपूरच्या कपड्यांनी लक्ष वेधून घेतलं. त्याने शॉर्ट्स व बनियन घालून लग्न केलं. त्याला त्या अवतारात पाहिल्यानंतर आयरा खानने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.

नुपूर शिखरे व आयरा दोघेही बुधवारी (३ जानेवारी रोजी) रात्री लग्नबंधनात अडकले. त्यापूर्वी नुपूर घरातून आठ किलोमीटर धावत ताज लँड्स एंड या लग्नस्थळी पोहोचला. त्याने शॉर्ट्स व बनियन घातले होते. धावत पोहोचल्यावर त्याने मनसोक्त ढोल वाजवला आणि डान्स केला. तसाच तो आत गेला आणि त्याच कपड्यांवर त्याने नोंदणी पद्धतीने लग्न केलं.

The boy jumps from the terrace for the reel he got Severe neck injury stunt video goes viral
रिलच्या नादात मुलाने गच्चीवरून मारली उडी; मानेला गंभीर दुखापत, व्हायरल होतोय VIDEO
Did Sania Mirza Marry Mohammad Shami Wedding Photos Going Viral
सानिया मिर्झा व मोहम्मद शमीच्या लग्नाचा फोटो होतोय व्हायरल? सानियाच्या वडिलांनी दिलेलं स्पष्टीकरण आधी वाचा
when grandpa said darling to grandma
जेव्हा आजोबा आजीला सर्वांसमोर डार्लिंग म्हणतात… व्हायरल VIDEO पाहून पोट धरुन हसाल
women in Mumbai Bhandup chawl dance so gracefully on marathi song
मुंबईच्या चाळीतील महिलांनी केला तुफान डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “बाईपण भारी देवा”
old lady helps his old husband for walking emotional video
VIDEO : मरेपर्यंत साथ देणारा जोडीदार पाहिजे! वृद्ध पती पत्नीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
I will look after bull as my father a farmers sons video goes viral
VIDEO : “बैलाला आयुष्यभर ‘बाप’ म्हणून सांभळणार” शेतकऱ्याच्या लेकाने मन जिंकले, चिमुकल्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल
A Woman shared jugaad video
Kitchen Jugaad : “गव्हाच्या पिठामध्ये शाम्पू टाकताच कमाल झाली..” महिलेने सांगितला अनोखा जुगाड, VIDEO होतोय व्हायरल
a poor child feeding ice cream to the street dog
“हा जगातील सर्वात श्रीमंत” गरीब चिमुकल्याने कुत्र्याला खाऊ घातली आइसक्रीम, VIDEO होतोय व्हायरल

Video: शॉर्ट्स व बनियनवर नुपूर शिखरेने आयरा खानशी केलं लग्न; नेटकरी आमिरच्या जावयाला ट्रोल करत म्हणाले, “शेरवानीचे पैसे…”

लग्न झाल्यानंतर आयराने त्याला आंघोळकरून कपडे बदलण्यास सांगितलं. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आयराच्या हातात माइक दिसत आहे. रीना दत्ता, आमिर खान आणि आझाद मंचावर उपस्थित असताना आयरा म्हणते, ‘नूपूर आता आंघोळीला जाणार आहे.’ यानंतर आयरा हसत हसत नुपूरला गूडबाय म्हणते. तिचं बोलणं ऐकून सर्वजण हसू लागतात.

Videos: आयरा खान व नुपूर शिखरे यांनी नोंदणी पद्धतीने केलं लग्न, मुकेश अंबानींनी पत्नीसह लावली हजेरी, व्हिडीओ आले समोर

दरम्यान, आयरा व नुपूरच्या लग्नात मुकेश अंबानी, नीता अंबानी यांनी हजेरी लावली होती. याशिवाय बरेच पाहुणे उपस्थित होते. लग्नात नुपूरने घातलेल्या कपड्यांमुळे त्याला ट्रोलही करण्यात आलं. पण नंतर त्याने कपडे बदलले आणि शेरवानी घातली. निळ्या शेरवानीत तो छान दिसत होता. तर आयराने लग्नात पारंपारिक लूक केला होता.