बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची लेक श्वेताची मुलं नव्या व अगस्त्य सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. गुरुवारी दोघांनी एका इव्हेंटला हजेरी लावली, तिथला त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओमध्ये अगस्त्य मोठी बहीण नव्याला तिचा ड्रेस नीट करण्यास मदत करतोय. जीक्यू अवॉर्ड सोहळ्याला अगस्त्य बहीण नव्याबरोबर पोहोचला. यावेळी रेड कार्पेटवर येताना तो बहिणीचा ड्रेस पकडून आला. मग त्याने फोटोंमध्ये बहिणीचा ड्रेस नीट दिसावा यासाठी तो व्यवस्थित केला. नव्याने पांढऱ्या रंगाचा फ्लोअर टच ड्रेस घातला होता, तो ड्रेस नीट करण्यास अगस्त्यने तिला मदत केली, मग दोघांनी फोटोसाठी पोज दिल्या.

वादानंतर अनेक वर्षांपासून अबोला, तरीही मामा गोविंदाने भाचीच्या लग्नाला लावली हजेरी; कृष्णा अभिषेक म्हणाला…

अगस्त्य व नव्याचा हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकरी कमेंट्स करून त्याचं कौतुक करत आहे. ‘हे दोघे माझे आवडते सेलिब्रिटी भाऊ-बहीण आहेत,’ ‘अगस्त्य किती छान’, ‘जेंटलमन’, ‘खूप छान’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी वरिंदर चावला या पापाराझी अकाउंटवरून शेअर केलेल्या व्हिडीओवर केल्या आहेत.

अगस्त्य व नव्याच्या व्हिडीओवरील कमेंट्स
अगस्त्य व नव्याच्या व्हिडीओवरील कमेंट्स

दरम्यान, अगस्त्यबद्दल बोलायचं झाल्यास त्याने ‘द आर्चीज’ या नेटफ्लिक्सवरील चित्रपटातून डिसेंबर २०२३ मध्ये बॉलीवूड पदार्पण केलं. तर नव्या मात्र अभिनयक्षेत्रापासून दूर आहे. ती उद्योजिका असून आपल्या वडिलांच्या बिझनेसमध्ये त्यांची मदत करते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agastya nanda helped sister navya naveli to style her dress video viral siblings goal hrc