भारतीय चित्रपटांचे महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू असूनही अभिनेता अगस्त्य नंदाचे हिरो मात्र आजोबा नाहीत. तो आजोबांचा नाही तर ‘मामू’ अभिषेक बच्चनचा चाहता आहे. मामाचे चित्रपट पाहून मी मोठा झालो, असं अगस्त्य सांगतो. तसेच आजोबांकडे आपण सुपरस्टार म्हणून पाहत नसल्याचंही अगस्त्यने नमूद केलं.
आजोबा अमिताभ बच्चन यांच्याबद्दल अगस्त्य म्हणाला, “हे ऐकायला विचित्र वाटेल पण मी त्यांना ‘अमिताभ बच्चन द सुपरस्टार’ म्हणून पाहत नाही, चाहते त्यांना भेटण्यासाठी कितीही गर्दी करत असले तरी मी त्यांना माझे आजोबा म्हणून पाहतो. माझे मामू खऱ्या अर्थाने माझे हिरो आहेत. आमची पिढी ‘धूम’, ‘हाऊसफुल्ल’, ‘गुरू’ बघत मोठी झाली. हे आमचे चित्रपट आहेत. जेव्हा मी ‘धूम’ चित्रपट पाहिला तेव्हा मला त्या बाइक्स बघून मी चकित झालो होतो. माझे आजोबा त्यांच्यापेक्षा एक पिढी पुढे होते, त्यामुळे मी त्यांना बघत मोठा झालो नाही. मी मामूला बघतच मोठा झालो, त्यामुळे मी मामूचा खूप मोठा चाहता होतो आणि अजूनही आहे.”
श्वेता बच्चन आई-वडिलांसह मुंबईत का राहते? पतीबरोबर न राहण्याचं कारण काय? जाणून घ्या
आजी जय बच्चन कामाबद्दल घरी चर्चा करण्याच्या विरोधात आहेत, असं विचारल्यावर अगस्त्य म्हणाला, “सुदैवाने, माझ्या मामूला ज्ञान देणं आवडतं, ही त्यांची आवडती गोष्ट आहे. ते तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल ज्ञान देऊ शकतात. मला फक्त बसून वाट पहावी लागते. पण त्यांचं ज्ञान खूप फायद्याचं आहे, मी ते ऐकतो आणि माझ्यासाठी त्यातलं काय कामाचं आहे ते घेतो.”
Video: “त्याच्या जन्माच्या पाच मिनिटांनंतर मी त्याला…”, नातू अगस्त्यबद्दल अमिताभ बच्चन बोलताना भावुक
अगस्त्य नंदाने ‘द आर्चीज’ मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. जोया अख्तरच्या या चित्रपटात सुहाना खान, खुशी कपूर, वेदांग रैना हे कलाकारही होते. अगस्त्य पुढे ‘श्रीराम राघवन’ यांच्या ‘इक्कीस’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्या जीवनावर आधारित असेल.