गेल्या वर्षी ‘द आर्चीज’ चित्रपटातून शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ( Suhana Khan ) आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाने ( Agastya Nanda ) बॉलीवूड क्षेत्रात पाऊल ठेवलं. झोया अख्तरच्या या चित्रपटातील सुहाना व अगस्त्यच्या अभिनयाच भरभरून कौतुक करण्यात आलं. ‘द आर्चीज’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीपासून सुहाना व अगस्त्य एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या. पण ‘द आर्चीज’च्या प्रदर्शनानंतर सुहाना व अगस्त्यच्या अफेअरच्या चर्चांना अधिक उधाण आलं. दोघांचे एकत्र व्हिडीओ, फोटो सतत व्हायरल होऊ लागले. आता यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे.

नुकतंच कॉमेडी ड्रामा वेब सीरिज ‘कॉल मी बे’चं स्क्रीनिंग पार पडलं. या सीरिजमध्ये अभिनेत्री अनन्या पांडे, वरुण सूद, विहान सामत, विर दास हे प्रमुख भूमिकेत आहेत. ‘कॉल मी बे’च्या स्क्रीनिंगला बॉलीवूडचे अनेक कलाकार मंडळी उपस्थित राहिले होते. अभिनेता कार्तिक आर्यन, सारा अली खान, खुशी कपूर, करण जोहर, तमन्ना भाटिया अशा बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. याच स्क्रीनिंग दरम्यानचा सुहाना खान व अगस्त्य नंदाचा ( Agastya Nanda ) व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Saif Ali Khan House Help Video
हाताला पट्टी अन् कपड्यांवर रक्ताचे थेंब, सैफ अली खानबरोबर हल्ल्यात जखमी झालेल्या मदतनीसचा Video Viral
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Abhishek Gaonkar and Sonalee Gurav
“माझ्या वडिलांचा विरोध…”, सोनाली अन् अभिषेक गावकरने सांगितला लव्ह स्टोरीचा रंजक किस्सा
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
akshay kumar filing kite with paresh rawal
Video : ‘भूत बंगला’च्या सेटवर अक्षय कुमारने उडवली पतंग; तर परेश रावल यांनी धरली फिरकी, व्हायरल झाला व्हिडीओ
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक

हेही वाचा – खुशबू तावडेच्या वाढदिवसानिमित्ताने पती संग्राम साळवीची खास पोस्ट, आभार मानत म्हणाला, “तुझी मिठी…”

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ने सुहाना व अगस्त्यचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये, सुहाना अगस्त्यबरोबर पाहायला मिळत आहेत. स्क्रीनिंगसाठी जमलेल्या गर्दीत अगस्त्य सुहानाची काळजी घेताना दिसत आहे. यावेळी सुहानाला कोणाचा धक्का लागू नये म्हणून अगस्त्य पुढे असलेल्या व्यक्तीला अगदी सहजपणे बाजूला करताना पाहायला मिळत आहे. सुहाना व अगस्त्यचा ( Agastya Nanda ) हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “ऐश्वर्याबरोबर जे झालं आहे ते पाहून असं वाटतं की, सुहानाने बच्चन किंवा नंदा कुटुंबात लग्न नाही केलं पाहिजे.” तसंच दुसऱ्या चाहत्याने लिहिलं, “याच्यापासून दूर राहा.” तर काही जणांनी अगस्त्यचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा – विशाखा सुभेदारचा मुलगा पुढील शिक्षणासाठी निघाला परदेशात, भावुक होत म्हणाली, “आज आमचा अबू…”

दरम्यान, सुहाना व अगस्त्यच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सुहाना लवकरच शाहरुख खानसह ‘द किंग’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तर अगस्त्य ‘इक्कीस’ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट श्रीराम राघवन दिग्दर्शित करत आहेत. १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धादरम्यानच्या एका बाप-लेकाच्या नात्याची कथा ‘इक्कीस’ चित्रपटात दाखवण्यात आली आहे. अगस्त्यने ( Agastya Nanda ) लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांची भूमिका साकारली आहे. तर धर्मेंद्र त्याचे वडील एमएल खेत्रपाल या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

Story img Loader