Aishwarya Rai And Abhishek Bachchan : अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. दोघेही एकमेकांपासून वेगळे राहतात, ऐश्वर्याला फक्त तिच्या लेकीची साथ आहे, अभिनेत्रीने जागतिक पातळीवर पार पडलेल्या महोत्सवात तिच्या नावातून बच्चन आडनाव हटवलं अशाप्रकारच्या बातम्या या दोघांबद्दल येऊ लागल्या होत्या. मात्र, या चर्चांदरम्यान काही दिवसांआधीच ऐश्वर्या व अभिषेक यांचा एका कौटुंबिक सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे दोघेही एकत्र आनंदी झाल्याचं स्पष्ट झालं होतं.

आता ऐश्वर्या ( Aishwarya Rai ) आणि अभिषेक जोडीने लेकीच्या शाळेत पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींची मुलं धीरूभाई अंबानी स्कूलमध्ये शिक्षण घेतात. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात बहुतांश सगळ्याच शाळांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सव साजरा केला जातो. याचप्रमाणे धीरूभाई अंबानी स्कूलमध्ये देखील शालेय मुलांसाठीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शाळेतील सगळी मुलं आपलं कलाकौशल्य सादर करतात. या कार्यक्रमाला सगळे सेलिब्रिटी आपल्या मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी उपस्थित राहिले होते.

School teacher dance on marathi song Mi Haay Koli song with student school video goes viral on social media
“मी हाय कोली सोरिल्या डोली न मुंबईच्या किनारी..”जिल्हा परिषद शाळेत सरांचा विद्यार्थ्यांसोबत जबरदस्त डान्स; VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”

हेही वाचा : “मी अभिनेत्री आहे हे पवनला माहिती नव्हतं…”, साऊथ इंडियन सासरी मराठी मालिका पाहतात का? रेश्मा शिंदे म्हणाली…

अभिषेक आणि ऐश्वर्या ( Aishwarya Rai ) यांची लेक आराध्या सुद्धा याच शाळेत आपलं शिक्षण पूर्ण करत आहेत. याचनिमित्ताने आपल्या लेकीला प्रोत्साहन देण्यासाठी हे स्टार जोडपं एकत्र पोहोचलं होतं. यावेळी आराध्याचे आजोबा आणि बॉलीवूडचे महानायक ‘बिग बी’ सुद्धा उपस्थित होते. अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी यावेळी काळ्या रंगाचे कपडे घालून Twinning केल्याचं पाहायला मिळालं.

ऐश्वर्या व अभिषेक जोडीने पोहोचले आराध्याच्या शाळेत

सध्या बच्चन कुटुंबीय एकत्र आराध्याच्या शाळेत पोहोचल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकी एका फोटोत अभिषेक ऐश्वर्याच्या ड्रेसची ओढणी सावरत असल्याचं पाहायला मिळतंय. याशिवाय गर्दीत धक्का लागू नये यासाठी अभिषेक ऐश्वर्याची विशेष काळजी घेताना दिसला. यावरून दोघांमध्ये सर्वकाही उत्तम असून ऐश्वर्या-अभिषेक एकमेकांबरोबर आनंदी असल्याचं स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा : “मला तुझी सासू असल्याचा खूप अभिमान…”, अंकिता लोखंडेला वाढदिवसानिमित्ताने सासूबाईकडून मिळालं खास गिफ्ट, म्हणाल्या…

Aishwarya Rai And Abhishek Bachchan
ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन बिग बी यांच्यासह आराध्याच्या शाळेत पोहोचले ( Aishwarya Rai And Abhishek Bachchan )

नेटकऱ्यांनी ऐश्वर्या-अभिषेकच्या या व्हायरल व्हिडीओ कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. त्यांच्या चाहत्यांनी अनेक महिन्यांनी दोघांना एकत्र पाहून आनंद व्यक्त केला आहे.

Story img Loader