बॉलिवूडमधल्या दोन सुंदर अभिनेत्री म्हणजेच ऐश्वर्या राय आणि सुश्मिता सेन. एक विश्वसुंदरी तर दुसरी ब्रह्मांड सुंदरी. या दोघींचीही कारकीर्द अगदी सोन्यासारखी झळाळून निघाली आहे हे भारतातल्या आणि जगातल्या प्रेक्षकांनी पाहिलं आहे. १९९४ हेच ते वर्ष होतं ज्या वर्षी ऐश्वर्या रायला विश्व सुंदरीचा आणि सुश्मिताला ब्रह्मांड सुंदरीचा किताब मिळाला होता. या दोघींचं नाव भारताच्या सुंदर इतिहासात कायमचं कोरलं गेलं आहे यात शंकाच नाही. या दोघींबाबत ही चर्चा करण्याचं कारण म्हणजे सुश्मिता आणि ऐश्वर्या या दोघींचा तीस वर्षांपूर्वीचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

सुश्मिता सेन मिस युनिव्हर्स झालेली पहिली भारतीय महिला

सुश्मिता सेनचं वैशिष्ट्य हे की मिस युनिव्हर्स हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय स्त्री आहे. तिला यासाठी बराच संघर्ष करावा लागला होता. तिने या स्पर्धेत भाग घेण्यासाठी जे कष्ट घेतले त्याबाबत विविध मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
PV Sindhu gets emotional seeing Vinod Kambli's video
PV Sindhu: विनोद कांबळीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून पीव्ही सिंधू झाली भावनिक; पैसे, चांगली माणसं याबाबत केलं मोठं विधान
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
Mahakumbh 2025 Grah Yog, subh yog horoscope
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्याच्या मुहूर्तावर ११४ वर्षांनी जुळून आला अद्भुत योग; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल, हाती लागणार पैशांचे घबाड
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो

सुश्मिता आणि ऐश्वर्या यांनी दिलेली उत्तरं चर्चेत

मिस इंडिया स्पर्धेत सुश्मिता आणि ऐश्वर्या यांच्यात टायब्रेकर झाल्यानंतर ऐश्वर्या रायला विचारण्यात आलं होतं की जर तुला तुझा पती म्हणून निवड करायला सांगितली तर तू बोल्ड अँड ब्युटीफूलमधला रिज फॉरेस्टर किंवा सांता बारबरामधल्या मेसन कैपवेल यांच्यापैकी कुणाची निवड करशील? त्यांच्यातल्या कुणाचे गुण तुला पटतात? त्यावर ऐश्वर्या राय म्हणाली की मेसन कैपवेलची निवड मी करेन कारण त्याची विनोदबुद्धी खूपच सुंदर आहे तसंच तो मला काळजी घेणारा वाटतो त्याच्यात आणि माझ्या स्वभावात अनेक गोष्टी सारख्या आहेत. यानंतर सुश्मिता सेनला विचारण्यात आलं की देशातल्या टेक्सटाइल हेरीटेजविषयी तुला काय माहीत आहे? हे किती काळापासून आहे आणि तुला परिधान करायला आवडतं का? त्यावर सुश्मिता म्हणाली, मला वाटतं की हे सारं काही महात्मा गांधींनी आणलेल्या खादीपासून सुरु झालं आहे. तेव्हापासून या सगळ्याची दीर्घ परंपरा भारतात आहे, असं उत्तर सुश्मिताने दिलं होतं.

हे पण वाचा- “मी जेवणाच्या टेबलावरचा शिष्टाचार…”; सुश्मिता सेनने सांगितला मेक्सिकोतील प्रसंग; म्हणाली, “मला खूप विचित्र…”

ऐश्वर्या रायने मिस वर्ल्ड हा किताब जिंकल्यानंतर तिचंही जगभरात कौतुक झालं. तसंच या दोघींनीही बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं आणि आपल्याला सशक्त अभिनयही करता येतो हे दाखवून दिलं. सुश्मिताने ओटीटी प्लॅटफॉर्मवरची आर्या साकारत तिथेही आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे. आता या दोघींचा तीस वर्षांपूर्वीचा फोटो व्हायरल झाला आहे.

व्हायरल फोटोत काय आहे?

हा फोटो मिस इंडियाचा जो टायब्रेकर झाला त्यावेळचा आहे असं दिसतं आहे. ३० वर्षांपूर्वीच्या या फोटोत सुश्मिता आणि ऐश्वर्या दोघीही दिलखुलासपणे हसताना दिसत आहेत. तसंच दोघींच्याही डोक्यावर ताज आहे. इंस्टाग्रामच्या bollywoodtrivapc या पेजने हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर लाइक्स कमेंट्सा पाऊस पडला आहे.

हे पण वाचा- सलमान खानला ऐश्वर्या रायविषयी विचारण्यात आला ‘तो’ प्रश्न, सोशल मीडियावर उत्तराचा व्हिडीओ व्हायरल

ऐश्वर्या रायने बॉलिवूडमध्ये आपली कारकीर्द गाजवल्यानंतर अभिषेक बच्चनशी लग्न केलं. ती आता अमिताभ बच्चन यांची सून आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या या दोघांनाही आराध्य नावाची मुलगी आहे. तर सुश्मिता सेनच्या आयुष्यात अनेक बॉयफ्रेंड आले पण तिने लग्न केलेलं नाही. तिने दोन मुलींना दत्तक घेतलं आहे आणि तिने सिंगल मदर म्हणून उत्तमपणे दोन्ही मुलींची जबाबदारी घेतली आहे.

Story img Loader