Anant Radhika Wedding: अनंत अंबानी व राधिका मर्चंट अखेर शुक्रवारी (१२ जुलै रोजी) विवाहबंधनात अडकले. हा शाही विवाह सोहळा जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पाडला. या लग्नाला देशातीलच नाही तर जगभरातून पाहुणे उपस्थित राहिले. या लग्नात विदेशी पाहुण्यांच्या भारतीय लूकने लक्ष वेधून घेतलं. या सोहळ्याला बच्चन कुटुंबाने हजेरी लावली होती, पण कुटुंबातील एका सदस्याने लग्नाला सर्वांबरोबर न येता एकटं येणं पसंत केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाला महानायक अमिताभ बच्चन, त्यांच्या पत्नी जया बच्चन, मुलगी श्वेता बच्चन, जावई निखिल नंदा, नातू अगस्त्य नंदा, नात नव्या नवेली व ज्युनिअर बच्चन म्हणजेच अभिषेक बच्चन यांनी एकत्र हजेरी लावली. त्यांच्याबरोबर फक्त ऐश्वर्या व आराध्या नव्हत्या, त्यामुळे या दोघी लग्नाला आल्या नाहीत, अशी चर्चा होती.

शुभमंगल सावधान! अखेर अनंत अंबानी-राधिका मर्चंट लग्नबंधनात अडकले, पहिला फोटो आला समोर

बच्चन कुटुंबाचा फोटो (सौजन्य – सोशल मीडिया)

थोड्याच वेळात ऐश्वर्या (Aishwarya Rai Bachchan Video) लेक आराध्यासह लग्नाला पोहोचली. एकीकडे संपूर्ण कुटुंबाने एकत्र पोज दिल्या, तर दुसरीकडे ऐश्वर्याने एकटीने पोज दिल्या, त्यानंतर लेक आराध्या तिथे पोहोचली.

रेखा, ऐश्वर्या व आराध्या यांचा व्हिडीओ

बच्चन कुटुंब गेल्यावर तिथे सदाबहार अभिनेत्री रेखा व ऐश्वर्या राय एकाच वेळी पोहोचल्या. आधीचे पाहुणे पोज देत असल्याने ऐश्वर्या व आराध्या थांबल्या होत्या, तिथेच रेखा गप्पा मारत उभ्या होत्या. या मायलेकीला पाहून रेखा तिथे पोहोचल्या आणि दोघींची भेट घेतली. दोघींची गळाभेट घेत त्यांनी आराध्याला गालावर प्रेमाने किस केलं, त्यानंतर रेखा व ऐश्वर्या थोडावेळ एकमेकींशी बोलल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

ऐश्वर्या बच्चन कुटुंबाबरोबर न आल्याने पुन्हा एकदा तिच्या व अभिषेकदरम्यान नाराजीच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. याआधीही खूपदा या जोडप्याच्या घटस्फोटाच्या चर्चा होत असतात मात्र प्रत्येकवेळी ते आपल्या कृतीतून या अफवा फेटाळून लावतात. पण यावेळी संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र आलं आणि फक्त आराध्या- ऐश्वर्या त्यांच्याबरोबर न आल्याने नेटकरी विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत.

Radhika Merchant Wedding Look: अंबानींच्या धाकट्या सूनबाईंचा शाही थाट, पाहा राधिका मर्चंटचे लग्नातील Photos

अनंत व राधिकाच्या लग्नात बॉलीवूड सेलिब्रिटी वरातील थिरकताना पाहायला मिळाले. या खास लग्नासाठी प्रियांका चोप्रा व तिचा पती निक जोनास भारतात आले होते. याशिवाय युकेचे दोन माजी पंतप्रधान, कार्दशियन सिस्टर्स, प्रसिद्ध रॅपर रेमा, रेसलर जॉन सीना हेदेखील आले होते. या लग्नाला महाराष्ट्रातील राजकीय नेतेही उपस्थित राहिले. तसेच गौतम अदानी यांनीही लग्नाला हजेरी लावली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai bachchan aaradhya skipped bachchan family photo meets rekha at anant radhika wedding see video hrc