Aishwarya Rai Bachchan- Abhishek Bachchan Video: ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा मागच्या बऱ्याच काळापासून सुरू आहेत. दोघांनी ग्रे डिव्हॉर्स घेतला आहे, ते दोघेही वेगळे राहतात पण मुलीचा सांभाळ एकत्र करतात, अशा अनेक बातम्या आतापर्यंत आल्या. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाला ऐश्वर्या राय मुलीबरोबर आली होती. तर अभिषेक आई-वडिलांबरोबर आला होता. त्यानंतर त्यांच्या नात्यातील दुराव्याबद्दल खूप बोललं गेलं. अशातच आता या जोडप्याचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबाबत विविध प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. दोघेही एकत्र दिसत नाहीत, ऐश्वर्या मुलीबरोबर, तर अभिषेक कुटुंबाबरोबर असतो. पण आता त्या दोघांचा जो व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होतोय, तो पाहून या दोघांचे चाहते नक्कीच खुश होतील. घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चन व ऐश्वर्या आपल्या मुलीबरोबर विदेशात फिरायला गेले आहेत.
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनचा व्हिडीओ-
रॉयल ब्लॅक लिमॉसचे सीईओ देव कुमार यांनी इन्स्टाग्रामवर या जोडप्याबरोबरचे काही फोटो व्हिडीओ बनवून शेअर केले आहेत. यामध्ये अभिषेक-ऐश्वर्या त्यांची लेक आराध्याबरोबर दिसत आहेत. दोघांना एकत्र पाहून चाहते खूप खूश आहेत.
अनेक महिन्यांपासून ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाबरोबर राहत नाही आणि ती तिच्या आईबरोबर राहायला गेली आहे. ऐश्वर्या व तिची नणंद श्वेता बच्चनची लेक नव्या नवेली नंदा दोघीही लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभाग्या झाल्या होत्या. श्वेता बच्चन आणि जया नव्यासाठी चिअर करताना दिसल्या, पण ऐश्वर्यासाठी त्यांनी कोणतीही पोस्ट केली नव्हती. यानंतर बच्चन कुटुंबात सगळं आलबेल नसल्याच्या चर्चा होऊ लागल्या.
दाक्षिणात्य चित्रपट आवडतात, मग तुम्ही बघितलेत का हे सस्पेन्स-थ्रिलर सिनेमे? OTTवर आहेत उपलब्ध
ऐश्वर्या व अभिषेक दोघांनी बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर एकमेकांसोबतचा एकही फोटो शेअर केलेला नाही किंवा त्यांच्या विभक्त होण्याच्या वृत्तावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. याच दरम्यान त्यांचा हा व्हिडीओ आला असून याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. दरम्यान, २००७ मध्ये ऐश्वर्या व अभिषेकचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले होते. या दोघांच्या लग्नाला बराच काळ लोटला असून आता त्यांच्यात मतभेदाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. यासाठी ट्रोलर्स सोशल मीडियावर पोस्ट करून जया बच्चन व श्वेता नंदा यांना जबाबदार धरतात.