ऐश्वर्या राय बच्चन यंदाच्या ‘कान्स चित्रपट महोत्सवात’ सहभागी होण्यासाठी फ्रान्सला रवाना झाली. या वेळी ऐश्वर्याबरोबर तिची मुलगी आराध्याही होती. सोशल मीडियावर आराध्या आणि ऐश्वर्याचे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत. काही लोक ऐश्वर्या आणि आराध्याच्या लूकचे कौतुक करत आहेत, तर काही जण तिला हेअरस्टाइलवरून ट्रोल करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- बाइकने शूटिंग सेटवर जाणं अनुष्काला पडलं महागात; ‘हा’ नियम मोडल्याने वाहतूक पोलिसांनी ठोठावला दंड

विमानतळावर ऐश्वर्या ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसली. तिने मोठ्या आकाराचे ब्लॅक जॅकेट घातले होते. तसेच तिने आपले केस मोकळे सोडले होते. तर आराध्याने डेनिमसोबत गुलाबी रंगाचा टी-शर्ट घातला होता. तसेच टीशर्टवर तिने डेनिमचे जॅकेटही घातले होते. आराध्याच्या जॅकेटच्या मागील बाजूस A असे लिहिले होते. आराध्या तिच्या नेहमीच्या हेअरस्टाईलमध्ये दिसली. ऐश्वर्या आणि आराध्या दोघींनाही एकाच हेअरस्टाइल आणि लूकसाठी ट्रोल केले जात आहे.

ऐश्वर्या आणि आराध्याच्या व्हिडीओवर यूजर्स कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले- ‘मला आता दुसरी हेअरस्टाइल पाहायला मिळावी अशी इच्छा आहे.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले- ‘ऐशला काय झाले? तोच ड्रेसअप, तीच हेअरस्टाईल. तिचे आयुष्य कंटाळवाणे झाले आहे असे दिसते. आता थोडा बदल हवा आहे.’

हेही वाचा- सलमान खानची बहीण अर्पिताच्या घरी चोरी, पाच लाखांचे कानातले चोरणाऱ्या नोकराला अटक

कान्स चित्रपट महोत्सवाला १६ मे पासून सुरुवात झाली. या सोहळ्यात बॉलीवूड तारकांनी आपला जलवा दाखवला. या महोत्सवात बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान, ईशा गुप्ता, मानुषी छिल्लर आणि उर्वशी रौतेला यांच्या लूकची चांगलीच चर्चा झाली.