Aishwarya Rai calls Maa to Rekha :अमिताभ बच्चन आणि रेखा यांचं प्रेम प्रकरण सर्वश्रूत आहे. अनेक वर्षे झाली असली तरी आजही या दोघांबद्दल बोललं जातं. अमिताभ व रेखा आजपर्यंत कधीच एकत्र काम करताना किंवा एकमेकांशी बोलताना दिसले नाही. ते एकमेकांचा सामना करणं टाळतात. पण बिग बींशिवाय बच्चन कुटुंबातील इतर सदस्यांशी रेखा खूप प्रेमाने वागतात.
जया आणि रेखा यांच्यात चांगली मैत्री होती. रेखा यांनी करिअरची सुरुवात केली तेव्हा जया यांनी खूप मदत केली होती. दोघीही मुंबईत एकाच इमारतीत राहायच्या. आताही जया व रेखा अनेकदा एकमेकींना भेटताना दिसतात. रेखा अभिषेक, ऐश्वर्या व त्यांची लेक आराध्या यांना भेटून प्रेम व्यक्त करत असतात. बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय हिला रेखाबद्दल विशेष जिव्हाळा आहे. रेखा आणि ऐश्वर्या जेव्हा जेव्हा एकमेकीना भेटतात तेव्हा त्यांच्यातील बॉन्ड दिसून येतो. ऐश्वर्याने एकदा तर रेखा यांना आई म्हटलं होतं.
जेव्हा रेखा यांना ऐश्वर्याने आई म्हणून मारलेली हाक
रेखा यांच्याप्रमाणेच ऐश्वर्या राय देखील दक्षिण भारतीय आहे. दक्षिणेत स्वत:हून मोठ्या महिलांना आई (मां) म्हणून हाक मारतात. ऐश्वर्याही तिच्या संस्कृतीचं पालन करते. एकदा स्टार स्क्रीन अवॉर्ड्समध्ये रेखा यांना ऐश्वर्याने हजारो लोकांसमोर मां म्हटलं होतं. ऐश्वर्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.
ऐश्वर्या रायला तिच्या कमबॅक चित्रपट ‘जज्बा’साठी स्टार स्क्रीन अवॉर्ड्समध्ये पुरस्कार देण्यात आला होता. ऐश्वर्याने रेखाकडून हा पुरस्कार स्वीकारला होता. या खास क्षणी पुरस्कार स्वीकारताना ऐश्वर्याने रेखा यांचे आभार मानले आणि म्हणाली, “मां कडून हा पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद झाला.” तिचं बोलणं ऐकून रेखा म्हणाल्या, “मला आशा आहे की मी तुला आणखी अनेक वर्षे हा पुरस्कार प्रदान करू शकेन.”

रेखा आणि ऐश्वर्याचं नातं खूप प्रेमळ आहे. ऐश्वर्या रायने चित्रपटसृष्टीत २० वर्षे पूर्ण केली तेव्हा रेखा यांनी तिच्यासाठी एक भावनिक पत्र लिहिलं होतं. हे पत्र फेमिना २०१८ मध्ये दाखवण्यात आलं होतं. पत्रात रेखा यांनी ऐश्वर्याबद्दल बऱ्याच गोष्टी लिहिल्या होत्या. ऐश्वर्याने तिच्या आयुष्यातील संघर्षांना किती हिमतीने तोंड दिलं आणि एक महत्त्वाचं स्थान मिळवलं, त्याचा उल्लेखही रेखा यांनी केला होता. त्या पत्रात रेखा यांनी स्वतःला ‘रेखा मां’ असं संबोधलं होतं.
ऐश्वर्याचे कौतुक करण्याची एकही संधी रेखा सोडत नाही. २०१७ मध्ये, फिल्मफेअर ग्लॅमर आणि स्टाईल अवॉर्ड्समध्ये रेखा यांनी ऐश्वर्याला स्वतःच्या हातांनी हा पुरस्कार दिला होता. त्यानंतर ऐश्वर्याच्या सौंदर्याचे कौतुक करताना रेखा म्हणाल्या होत्या की, ऐश्वर्याची आई जेव्हा गरोदर होती तेव्हा ती माझे फोटो पाहत राहायची आणि त्यामुळे ऐश्वर्या इतकी सुंदर दिसते.