अलीकडेच बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला ( Aishwarya Rai Bachchan ) दुबईत झालेल्या ‘साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवार्ड्स’ (SIIMA 2024) या पुरस्कार सोहळ्यात गौरविण्यात आलं. ऐश्वर्याला ‘पोन्नियिन सेलवन: २’ या चित्रपटासाठी समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. निर्माता कबीर खानच्या हस्ते ऐश्वर्याला हा पुरस्कार दिला गेला. याचे व्हिडीओ, फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. यातील ऐश्वर्याची लेक आराध्याच्या ( Aaradhya Bachchan ) एका व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओत आराध्याची कृती पाहून नेटकरी कौतुक करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुबईत पार पडलेल्या SIIMA 2024 या पुरस्कार सोहळ्यात ऐश्वर्या राय-बच्चनबरोबर ( Aishwarya Rai Bachchan ) आराध्या देखील सहभागी झाली होती. ऐश्वर्याने ब्लॅक आणि गोल्डन गाउन परिधान केला होता. तर आराध्या सिल्वर आणि ब्लॅक शिमरी आउटफिटमध्ये पाहायला मिळाली. या सोहळ्यात ऐश्वर्या आपल्या लाडक्या लेकीचा हातात हात घेऊन एन्ट्री करताना दिसली. एवढंच नव्हे तर पुरस्कार मिळाल्यानंतर आराध्या आपल्या आईचे फोटो काढताना पाहायला मिळाली. यादरम्यानच्या आराध्याच्या कृतीचं कौतुक होतं आहे. याचा व्हिडीओ ‘मानव मंगलानी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – “बिग बॉसच्या घरात निक्कीच्या बडबडीचा खूप त्रास होतो”, एलिमिनेट झालेल्या वैभव चव्हाणचं विधान, म्हणाला, “तिचा मूळ स्वभाव…”

या व्हिडीओत, ऐश्वर्या ( Aishwarya Rai Bachchan ) पुरस्कार मिळाल्यानंतर चियान विक्रमबरोबर हातात हात घेऊन स्टेजवरून खाली उतरताना दिसत आहे. स्टेजवरून उतरताच आराध्या धावत ऐश्वर्याला मिठी मारते आणि दोघी निघताना पाहायला मिळत आहेत. पण तितक्यात चियान विक्रमला भेटण्यासाठी सुपरस्टार डॉ. शिवा राजकुमार येतो. त्यामुळे शिवाला भेटण्यासाठी ऐश्वर्या देखील मागे फिरताना दिसत आहे. यावेळी ऐश्वर्या आपल्या लाडक्या मुलीची ओळख शिवाला करून देते. तेव्हा शिवा आराध्याला हात मिळवण्यासाठी पुढे येतो. पण आराध्या शिवाला हात न मिळवताच त्याच्या पाया पडते. हे पाहून शिवा देखील तिला आशीर्वाद देतो. आराध्याच्या याच कृतीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

नेटकरी काय म्हणाले?

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी आराध्याचं भरभरून कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “ऐश्वर्याची ( Aishwarya Rai Bachchan ) मुलगी तिच्यासारखीच संस्कारी असल्याचं पाहून मला आनंद झाला.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “ऐश्वर्याने आपल्या मुलीला खूप चांगली वागणूक दिली आहे.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “हे संस्कार बच्चन कुटुंबियांकडून मिळाले आहेत.”

हेही वाचा – Video : बीबी करन्सीच्या टास्कमध्ये अभिजीत सावंतने केली गडबड, घरातील सदस्यांसह ‘बिग बॉस’नेही घेतली त्याची फिरकी

दरम्यान, ‘पोन्नियिन सेलवन: २’ चित्रपटात ऐश्वर्या राय-बच्चनने ( Aishwarya Rai Bachchan ) दुहेरी भूमिका साकारली आहे. नंदिनी आणि मंदाकिनी देवी या दोन भूमिकेत ऐश्वर्या झळकली आहे. एका तामिळ कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहेत. या चित्रपटात ऐश्वर्या व्यतिरिक्त कार्ती, जयम रवी, त्रिशा, जयराम, प्रभू, आर सरथकुमार, शोभिता धुलिपाला, ऐश्वर्या लक्ष्मी, विक्रम प्रभू, प्रकाश राज, रहमान आणि आर पार्थिवन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai bachchan daughter aaradhya bachchan touches south superstar shiva rajkumar feet take blessings video viral pps