Aishwarya Rai Bachchan and Deepika Padukone: मुकेश व नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचा १२ जुलैला मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. अनंत अंबानीने राधिका मर्चंट हिच्याशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. अनंत-राधिकाचं लग्न झालं असलं तरी लग्नानंतरचे कार्यक्रम अजूनही सुरू आहेत. दोघांच्या लग्नातील अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अशातच अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन व दीपिका पदुकोणच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या लग्नाला बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. महानायक अमिताभ बच्चन, जया बच्चन, रेखा, शाहरुख खान, सलमान खान, ऐश्वर्या राय-बच्चन प्रियांका चोप्रा, माधुरी दीक्षित, रणवीर कपूर, रणबीर सिंह, आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, विकी कौशल, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, सारा अली खान, रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख अशा अनेक बॉलीवूडच्या कलाकारांनी अनंत-राधिकाच्या लग्नाला खास हजेरी लावली होती. या कलाकारांचा लग्नात जबरदस्त डान्स देखील पाहायला मिळाला. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाले आहेत. पण असं असलं तरी ऐश्वर्या राय-बच्चन व दीपिका पदुकोणच्या एका व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे. दोघींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हायरल व्हिडीओ अनंत-राधिकाच्या लग्नमंडपातील आहे.

हेही वाचा – Radhika Merchant: नवविवाहित अंबानींच्या धाकट्या सुनेची हिऱ्याची अंगठी अन् मंगळसूत्र पाहिलंत का? आहे खूपचं खास

या व्हिडीओत, अनंत-राधिकाच्या लग्नमंडपात गरोदर असलेल्या दीपिका पदुकोणला पाहून ऐश्वर्या घट्ट मिठी मारताना दिसत आहे. यावेळी ऐश्वर्या दीपिकाला पाहून भावुक झाल्याचं म्हटलं जातं आहे. दोघींच्या या व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

ऐश्वर्या राय-बच्चन व दीपिका पदुकोण (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)

ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगमधील ऐश्वर्या-दीपिकाचा ‘तो’ व्हिडीओ झाला होता व्हायरल

दरम्यान, याआधी २०१८ला ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगमधील ऐश्वर्या राय-बच्चन व दीपिका पदुकोणचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत ऐश्वर्या व दीपिका जबरदस्त डान्स करताना दिसल्या होत्या. दोघींचा हा व्हिडीओ अजूनही चर्चेत असतो.

हेही वाचा – Aishwarya Rai Bachchan: घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या-अभिषेकचा ‘तो’ फोटो अन् व्हिडीओ व्हायरल, अनंत अंबानीच्या लग्नात दोघं…

अनंत अंबनीच्या लग्नाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या काही महिन्यांपासून अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा शाही लग्नसोहळा सुरू आहे. २९ डिसेंबर २०२३ला अनंत-राधिकाचा राजस्थानमध्ये साखरपुडा झाला होता. राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिरामध्ये मोठ्या थाटामाटात दोघांचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर १८-१९ जानेवारी २०२४ला राधिकाचा मेहेंदी सोहळा झाला. यावेळी गोल धना एंगेजमेंट पार्टी आयोजित केली होती; ज्याला बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. मग एका महिन्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात अनंत-राधिकाचा पहिला प्री-वेडिंग सोहळा जामनगरमध्ये झाला. या प्री-वेडिंग सोहळ्याला देखील देश-विदेशातील दिग्गज मंडळींनी उपस्थिती लावली होती.

हेही वाचा – Emraan Hashmi: “मला ऐश्वर्या राय-बच्चनची माफी मागायची आहे”, इमरान हाश्मीला अभिनेत्रीसंबंधित ‘त्या’ वक्तव्यामुळे झाला पश्चाताप, म्हणाला…

अनंत-राधिकाच्या पहिल्या प्री-वेडिंगनंतर १८ मे ते १ जूनपर्यंत दुसरं प्री-वेडिंग आलिशान क्रूझवर करण्यात आलं. इटली ते फ्रान्स असा प्रवास करत अनंत-राधिकाचं दुसरं प्री-वेडिंग झालं. त्यानंतर जुलै महिना सुरू होताच सामूहिक विवाह सोहळा, मामेरू समारंभ, गरबा नाईट्स, संगीत समारंभ, ग्रह शक्ती पूजा, शिव शक्ती पूजा, हळदी, मेहंदी असे कार्यक्रम पार पडले. आणि अखेर १२ जुलैला अनंत-राधिका लग्नबंधनात अडकले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai bachchan emotional as she hugs mom to be deepika padukone at anant ambani radhika merchant wedding video viral pps