Aishwarya Rai Abhishek Bachchan: आपल्या सौंदर्याने व अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन मागील काही काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या व अभिषेक बच्चनचा घटस्फोट झाला आहे, अशा बातम्या येत आहेत. या दोघांनीही अद्याप त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही, अशातच तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरील एका गोष्टीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
ऐश्वर्या राय बच्चनचे जगभरात चाहते आहेत. तिला सोशल मीडियावर कोट्यवधी लोक फॉलो करतात. अगदी सेलिब्रिटींपासून ते सामान्य लोकांपर्यंत अनेकांचा तिच्या फॉलोअर्समध्ये समावेश आहे. तिच्या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत असतात. इन्स्टाग्रामवर १४.३ मिलियन असलेली ऐश्वर्या राय स्वतः मात्र फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करते, कोण आहे ती व्यक्ती? तिचं इन्स्टाग्राम अकाउंट पाहिल्यास ती पती अभिषेक बच्चनला फॉलो करते. कोट्यावधी फॉलोअर्स असलेली ऐश्वर्या इन्स्टाग्रामवर फक्त पती अभिषेकला फॉलो करते.
हेही वाचा – पहिल्या रिलेशनशिपमधून ५ वर्षांचा मुलगा, दोन महिन्यांपूर्वी लग्न करणारी बॉलीवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई
कोणाला फॉलो करते ऐश्वर्या राय बच्चन?


ऐश्वर्या रायच्या घटस्फोटाच्या चर्चा मागील वर्षभरापासून सुरू आहेत. ऐश्वर्या अनेक कार्यक्रमांना लेक आराध्याबरोबर जात असते. बच्चन कुटुंबीय तिच्याबरोबर नसतात. अभिषेकही नसतो, त्यामुळे या दोघांच्या नात्यात सगळं आलबेल नसल्याचं म्हटलं जातंय. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नात अभिषेक बच्चन कुटुंबाबरोबर आला होता, तर ऐश्वर्या त्याच ठिकाणी मुलगी आराध्याबरोबर काही वेळाने पोहोचली होती. तेव्हापासून या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय. तसेच ऐश्वर्याने मागील वर्षी झालेल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन फक्त मुलगी आराध्याबरोबर केलं होतं. त्यामुळे अभिषेक व ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल विविध गोष्टी बोलल्या जात आहेत.
ऐश्वर्या व अभिषेक यांनी २००७ मध्ये लग्नगाठ बांधली होती. दोघेही १६ नोव्हेंबर २०११ मध्ये मुलगी आराध्याचे आई-बाबा झाले. दोघांच्या लग्नाला १७ वर्षे झाली आहेत.