बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने नुकतीच ७७ व्या ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये हजेरी लावली. तिचे कानमधील दोन लूक खूप चर्चेत आहेत. तिचे लूक पाहून चाहते खूप कौतुक करत आहेत. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये चाहत्यांना ऐश्वर्याच्या हाताच्या दुखापतीची काळजी वाटत होती. या फिल्म फेस्टिव्हलमधून ऐश्वर्या राय आता भारतात परतली आहे. एअरपोर्टवर ऐश्वर्याला पाहून पापाराझींनी तिच्या हाताला फ्रॅक्चर कसे झाले असा प्रश्न विचारला. आता लवकरच तिच्या हातावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘हिंदुस्तान टाइम्स’ने अभिनेत्रीच्या जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, “एक आठवड्यापूर्वी ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झाली होती. पण फ्रॅक्चर असूनही तिने ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ जाणं रद्द केलं नाही. तिला तिची ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ला जाण्याची परंपरा पुढे चालू ठेवायची होती. त्यामुळे दुखापतीनंतरही तिने आपल्या प्रोफेशनल कमिटमेंट्स पूर्ण करत कार्यक्रमाला हजेरी लावली.”

ऐश्वर्या राय बच्चनचे Cannes मधील २२ वे वर्ष; हाताला प्लास्टर अन् लेक आराध्याची साथ, पाहा खास Photos

ऐश्वर्या राय बच्चन तज्ज्ञ आणि तिच्या डॉक्टरांशी बोलल्यानंतर फ्रान्सला गेली होती. आता भारतात आल्यानंतर लवकरच तिच्या हातावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे ती तिच्यावर पुढील आठवड्याच्या अखेरीस शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, असंही सूत्राने सांगितलं. मात्र अभिनेत्रीला दुखापत कशी झाली हे अजून समजू शकलेलं नाही. तिच्या हातावर पुढच्या आठवड्यात शस्त्रक्रिया होईल.

बॉलीवूडमधील एकमेव मित्र म्हणजे सलमान खान; संजय लीला भन्साळींचा खुलासा, म्हणाले, “तो माझी काळजी घेतो…”

दरम्यान, या फिल्म फेस्टिव्हलमधील ऐश्वर्याच्या दोन्ही लूकची खूप चर्चा होत आहे. पहिल्या दिवशी तिने ब्लॅक अँड व्हाइट गोल्डन टच असलेला गाऊन घातला होता. तर दुसऱ्या दिवशी तिने निळा, हिरवा आणि सिल्व्हर रंगाचा टिन्सेल गाऊन परिधान केला होता. ऐश्वर्याबरोबर तिची मुलगी आराध्या बच्चनही फ्रान्सच्या फ्रेंच रिव्हिएरामध्ये आयोजित कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचली होती. या कार्यक्रमात १२ वर्षांची आराध्या जखमी आईची काळजी घेताना दिसली होती. दोघी माय-लेकींचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत होते.

दुखापतग्रस्त ऐश्वर्या राय बच्चनची काळजी घेताना दिसली १२ वर्षांची लेक; आराध्याच्या ‘त्या’ व्हिडीओने वेधलं लक्ष

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास ऐश्वर्या राय बच्चन शेवटची मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियन सेल्वन २’ मध्ये जयम रवी, सोभिता धुलिपाला आणि ऐश्वर्या लक्ष्मी यांच्यासह दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. त्यापूर्वी या चित्रपटाचा पहिला भाग आला होता, त्यालाही प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai bachchan hand injury surgery to be done on actress hrc