बॉलिवूडमधील नेपोटीजम याविषयी आजवर बरीच चर्चा झाली आहे. सोशल मीडियावर तर हा वाद कायम सुरूच असतो. एखाद्या स्टारकीडला मिळणारी संधी आणि त्यामुळे त्यांचं ट्रोल होणं हे अगदीच आपल्यासाठी नेहमीचं झालं आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर नेपोटीजमच्या वादाला एक वेगळं वळण मिळालं. याबद्द बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटीजनीसुद्धा भाष्य केलं आहे.
सध्या मात्र सोशल मीडियावर अभिनेत्री ऐश्वर्या रायचा एक जुना व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या नेपोटीजम, स्टारकिड्स आणि त्यांना मिळणाऱ्या संधीबद्दल भाष्य करताना दिसत आहे. या संदर्भात मत मांडताना तिने आलिया भट्टविषयी भाष्य केलं आहे. निर्माता दिग्दर्शक करण जोहर हा आलियाच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता आणि त्याच्यामुळेच आज आलिया एवढी लोकप्रिय झाली असं अप्रत्यक्षपणे ऐश्वर्या या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे.
आणखी वाचा : “तुला लाज वाटली पाहिजे” तापसी पन्नूने घातलेल्या नेकलेसमुळे नेटकरी संतापले; नेमकं कारण काय?
याविषयी ऐश्वर्या म्हणाली, “करण जोहरसारखा गॉडफादर आलियाला लाभला हे तिचं नशीब आहे. त्याने तिला दिलेल्या पाठिंब्यामुळे तिला चित्रपटात काम करायची संधी सहज मिळाली ही गोष्ट नाकारून चालणार नाही. करण जोहरमुळे तिला बऱ्याच संधी मिळाल्या आणि त्यामुळेच चित्रपटात काम मिळवणं हे तिला जड गेलं नाही. अर्थात तिला मिळालेल्या संधीचं तिने सोनं केलं, पण या संधी तिच्या पदरात नियमित पडत होत्या म्हणून हे शक्य झालं.”
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, लोक ऐश्वर्याचं कौतुकही करत आहेत. लोक कॉमेंट करत ऐश्वर्याची पाठ थोपटत आहेत. ऐश्वर्या आता मणी रत्नम यांच्या आगामी ‘पीएस २’ या दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पीएस १’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती.