बॉलीवूडचे कलाकार सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटामुळे, कधी त्यांच्या अभिनयामुळे, तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय ( Aishwarya Rai Bachchan ) आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला संपूर्ण जगभरातील नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली होती. बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारदेखील वेगळ्या अंदाजात या सोहळ्याला उपस्थित होते. ऐश्वर्या राय-बच्चननेदेखील हजेरी लावली होती. मात्र, ती बच्चन कुटुंबासोबत न आल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. अभिषेक बच्चन ( Abhishek Bachchan ) आणि ऐश्वर्या एकमेकांपासून वेगळे होणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून होताना दिसत आहेत. आता अभिनेत्री या सोहळ्यात आपल्या मुलीसोबत म्हणजेच आराध्या बच्चनसोबत हजर राहिली; तर संपूर्ण बच्चन कुटुंबाने एकत्र हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. त्यामुळे बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये काहीच सुरळीत नसल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे.
ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबासोबत न आल्याने काय म्हणाले नेटकरी?
ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या या दोघींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने, “त्या सगळ्या त्या कानांवर येणाऱ्या चर्चा खऱ्या होत्या”, अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका युजरने, “कमीत कमी अभिषेक बच्चनने तरी या दोघींसोबत असायला हवे होते”, असे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने, “अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात ऐश्वर्याने पापाराझींना बच्चन कुटुंबाशिवाय पोझ दिली”, असे म्हणत आश्चर्य व्यक्त केले आहे.
दरम्यान, ऐश्वर्याला पाहताच अभिनेत्री रेखाने पुढे येऊन तिची भेट घेतली. आराध्या आणि ऐश्वर्या या दोघींची गळाभेट घेत, त्यांनी आराध्यासोबत बोलताना दिसल्या. त्यानंतर रेखा व ऐश्वर्या थोडा वेळ एकमेकींशी बोलल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे श्वेता बच्चन, अगस्त्य नंदा, नव्या नवेली, अभिषेक बच्चन, जया बच्चन, अमिताभ बच्चन यांनी एकत्र पोझ दिल्या. त्यांच्याबरोबर फक्त ऐश्वर्या आणि आराध्या नव्हत्या. त्यामुळे बच्चन कुटुंबात काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा : ‘कल्की : २८९८ एडी’चा जगभरात जलवा! प्रभासच्या चित्रपटाने केला हजार कोटींचा टप्पा पार
अनेक दिवसांपासून हे जो़डपे वेगळे होणार, असे म्हटले जात होते. जया बच्चन आणि ऐश्वर्या यांच्यातील विवाद याला कारणीभूत असल्याचेदेखील म्हटले जात होते. मात्र, ऐश्वर्या, अभिषेक किंवा इतर बच्चन कुटुंबीयांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
© IE Online Media Services (P) Ltd