Aishwarya Rai Bachchan Post for Amitabh Bachchan : बच्चन कुटुंबात मतभेद असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून होत आहेत. अशातच शुक्रवारी ऐश्वर्या राय बच्चनने सासरे अमिताभ अमिताभ बच्चन यांच्यासाठी केलेल्या पोस्टने लक्ष वेधले आहे. ११ ऑक्टोबरला मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस होता. बिग बी ८२ वर्षांचे झाले आहेत. यानिमित्ताने त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
शुक्रवारी मध्यरात्री वाढदिवस संपण्याच्या काही वेळाआधी अमिताभ बच्चन यांची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ऐश्वर्याने अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा आराध्याबरोबरचा एक फोटो शेअर केला. ‘हॅप्पी बर्थडे पा-दादाजी, देव तुम्हाला आशीर्वाद देवो,’ असे कॅप्शन ऐश्वर्याने दिले आहे.
ऐश्वर्या रायची पोस्ट
फोटोत आराध्या आजोबांना मिठी मारत आहे, आराध्याच्या हातात गुलाबाचं फूलही आहे. ऐश्वर्या रायने बऱ्याच दिवसांनी तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे, त्यामुळे चाहत्यांनी तिला इन्स्टाग्रामवर सतत पोस्ट करत राहण्याची विनंती केली आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा – Jigra vs Vicky Vidya Ka Woh Wala Video: राजकुमार राव की आलिया भट्ट, कोणाच्या सिनेमाने केली जास्त कमाई? वाचा
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या बातम्या मागील काही महिन्यांपासून सातत्याने येत आहेत. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नानंतरच या दोघांच्या नात्याबद्दल जास्त चर्चा होऊ लागली. कारण या लग्नात अभिषेक त्याच्या संपूर्ण कुटुंबासह पोहोचला पण ऐश्वर्या त्याच्यासोबत नव्हती. काही वेळाने ऐश्वर्या मुलगी आराध्यासह पार्टीत पोहोचली होती.
हेही वाचा – सूर जुळले…! म्हणत कोकण हार्टेड गर्लने अखेर दाखवला होणाऱ्या पतीचा चेहरा, नावही आलं समोर
नुकताच ऐश्वर्या रायला दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आयफा उत्सवात पुरस्कार मिळाला तेव्हाही ती फक्त तिच्या मुलीबरोबर तिथे पोहोचली होती. याशिवाय पॅरिस फॅशन वीक असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम असो, ऐश तिच्या मुलीबरोबर सगळीकडे दिसते. अभिषेक व बच्चन कुटुंबीय तिच्याबरोबर नसतात.