Aishwarya Rai Bachchan : गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय-बच्चन खूप चर्चेत आली आहे. अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्याला बच्चन कुटुंबियांबरोबर ऐश्वर्या उपस्थितीत राहिली नव्हती. लाडकी लेक आराध्याबरोबर ऐश्वर्या अनंत-राधिकाच्या लग्नाला पोहोचली होती. तेव्हापासून ऐ्श्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच ऐश्वर्या राय-बच्चन ( Aishwarya Rai Bachchan ) लेक आराध्याबरोबर अमेरिकेत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. अमेरिकेतील ऐश्वर्याचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता ऐश्वर्या लेकीसह अमेरिकेहून सुट्टी एन्जॉय करून मुंबईत परतील आहे. यासंबंधित ऐश्वर्या व आराध्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर ऐश्वर्या राय-बच्चन ( Aishwarya Rai Bachchan ) आणि आराध्या बच्चन यांचा मुंबई विमानतळावरील व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, ऐश्वर्या काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत असून आराध्या फिकट जांभळ्या रंगाचा टॉप आणि काळ्या पॅन्टवर पाहायला मिळत आहे. नेहमीप्रमाणे ऐश्वर्या लेकीची काळजी घेत तिला गाडीत बसवताना दिसत आहे. एवढंच नव्हे तर यावेळी ऐश्वर्याने पापाराझींशी संवाद साधला. त्यांना गुड मॉर्निंग म्हणाली.

हेही वाचा – अनंत अंबानींच्या लग्नाचं निमंत्रण मिळालेला मराठी अभिनेता झळकणार आता लोकप्रिय मालिकेत, म्हणाला, “खूप दिवसांनी पुन्हा…”

Aishwarya Rai Bachchan

हेही वाचा – Video: शशांक केतकरचं सुंदर घर पाहिलंत का? नेटकरी करतायत कौतुक, पाहा व्हिडीओ

ऐश्वर्या ( Aishwarya Rai Bachchan ) व आराध्याचा हा मुंबई विमानतळावरील व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. नेटकऱ्यांनी व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी ऐश्वर्या व आराध्याच्या लूकविषयी प्रतिक्रिया दिली आहे. “आराध्या अभिषेक बच्चन सारखी हुबेहूब दिसते”, असं म्हणतं आहेत. तसंच काही नेटकऱ्यांनी “आराध्या शाळेत जात नाही का? अभ्यास करते की नाही?” असे सवाल उपस्थित केले आहेत.

हेही वाचा – Bigg Boss OTT 3मध्ये ‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडचा जलवा, पाहा जबरदस्त परफॉर्मन्सचे व्हिडीओ

ऐश्वर्या इन्स्टाग्रामवर बच्चन कुटुंबातील ‘या’ एकाच व्यक्तीला इन्स्टाग्रामवर करते फॉलो

दरम्यान, गेल्या बऱ्याच दिवसांपासून ऐश्वर्या व अभिषेकच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. इन्स्टाग्रामवर ऐश्वर्या फक्त अभिषेकलाच फॉलो करते. बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्याला फॉलो करत नाही. सासरे अमिताभ बच्चन यांना देखील ऐश्वर्या फॉलो करत नाही आणि त्यांच्याबरोबर ती जास्त दिसतही नाही. कोणताही कार्यक्रम असो ऐश्वर्या ( Aishwarya Rai Bachchan ) सासरच्यांपासून दूर-दूर असते. त्यामुळेच ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांना नेहमी उधाण येत असतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai bachchan returns from america with duaghter aaradhya bachchan video viral pps