ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चन लेक आराध्यावर अगदी जिवापाड प्रेम करतात. दोघंही आपल्या कामामधून वेळ काढत आराध्याबरोबर एकत्रित वेळ घालवताना दिसतात. ऐश्वर्या-अभिषेकच्या लेकीचा आज वाढदिवस आहे. आराध्या आता ११ वर्षांची झाली आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्याने इन्स्टाग्रामद्वारे लेकीबरोबरचा गोड फोटो शेअर केला. तसेच तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण आता या पोस्टमुळेच ऐश्वर्या ट्रोल होत आहे.
ऐश्वर्याचं तिच्या लेकीवर किती प्रेम आहे हे व्हायरल व्हिडीओ व फोटोंमधून दिसून येतं. आपल्या लेकीच्या सुरक्षिततेबाबत ऐश्वर्या अधिक काळजी घेतानाही दिसते. आराध्याच्या वाढदिवसानिमित्त एक गोड फोटो ऐश्वर्याने शेअर केला. या फोटोमध्ये ती आराध्याला किस करताना दिसत आहे.
ऐश्वर्या आराध्याच्या ओठांवर किस करत असल्याचा हा फोटो आहे. हा फोटो पाहून नेटकऱ्यांचा राग अनावर झाला. त्यांनी कमेंटच्या माध्यमातून ऐश्वर्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. माझं प्रेम, “माझं आयुष्य, आय लव्ह यु आराध्या” असं ऐश्वर्याने लेकीबरोबरचा फोटो शेअर करत म्हटलं.
आणखी वाचा – Video : ‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या ‘त्या’ सीनदरम्यान झाली मोठी चूक? लग्न न करताच अनामिकाने…
ओठांवरच किस का केलं?, पालकांनी आपल्या मुलांना अशाप्रकारे किस करू नये, ही भारतीय संस्कृती नाही अशा कमेंट ऐश्वर्या-आराध्याचा फोटो पाहून नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर काहींनी या माय-लेकीच्या या फोटोचं कौतुकही केलं आहे.