Aishwarya Rai Bachchan : बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने नुकतेच आराध्याच्या वाढदिवसाचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. आराध्याचा वाढदिवस १६ नोव्हेंबरला साजरा झाला. अशात ऐश्वर्याने आज तिच्या वडिलांच्या जयंतीनिमित्त मुलगी आणि बाबा दोघांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२१ नोव्हेंबर रोजी ऐश्वर्याचे वडील कृष्णा राय यांची जयंती साजरी केली जाते. कृष्णा राय आता या जगात नाहीत. मात्र, त्यांच्या जयंतीनिमित्त ऐश्वर्याने त्यांच्या फोटोंना पुष्प वाहतानाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिने शेवटी आराध्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचेही काही फोटो पोस्ट केले आहेत. ऐश्वर्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये सुरुवातीला आराध्या कृष्णा राय यांच्या फोटोला अभिवादन करताना दिसत आहे; तर नंतर आराध्या आणि आई वृंदा यांच्यासोबतचा एक फोटो ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

हेही वाचा : वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा…”, ‘अंतरपाट’ मालिकेत झळकलेल्या अभिनेत्रीची पतीसाठी खास पोस्ट, म्हणाली…

ऐश्वर्याने पोस्ट केलेल्या काही फोटोंमध्ये आराध्याच्या बालपणीच्या आठवणीदेखील आहेत. फोटो पोस्ट करत ऐश्वर्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “माझे बाबा आणि मुलगी आराध्या दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही कायम माझ्या हृदयात आहात”, असं कॅप्शन लिहित तिनं यावर हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. ऐश्वर्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि हार्ट इमोजीचा वर्षाव केला आहे.

नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये ऐश्वर्याचं कौतुक केलं आहे. “तू सर्वात सुंदर आई आहेस”, असं एकाने कमेंटमध्ये लिहिलं आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने, “एक स्त्री म्हणून तुझा अभिमान वाटतो. तुझा आतापर्यंतचा प्रवासही तुझ्यासारखाच सुंदर आहे.” “ऐश्वर्याचं आपल्या मुलीवर ज्या प्रकारे प्रेम आहे, ते अविश्वसनीय आहे”, अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्याच्या वैवाहिक जीवनाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात दरी निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यात ऐश्वर्याने आराध्याच्या वाढदिवसाचे काही फोटो पोस्ट केलेत. यामध्ये अभिषेक बच्चन दिसत नाही, त्यामुळे हे दोघेही विभक्त होणार अशी चर्चा पुन्हा एकदा जोर धरत आहे.

हेही वाचा :मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात; केळवणाचे फोटो आले समोर

नेटकऱ्यांनी ऐश्वर्याने शेअर केलेल्या काही फोटोंवर अभिषेक बच्चनबद्दल प्रश्न विचारले आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “फोटोमध्ये बच्चन कुटुंबातील कोणीही नाही. अभषेक बच्चनही नाही, त्यामुळे घटस्फोटाची माहिती आता खरी वाटत आहे.” ऐश्वर्या गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबासोबत राहत नाही असं म्हटलं जात आहे. तसेच अभिषेक बच्चन ‘दसवी’ या चित्रपटातील सहकलाकार निम्रत कौरबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू आहेत. असे असले तरी अभिषेक आणि ऐश्वर्या दोघांनीही अद्याप या चर्चांवर आपलं मत व्यक्त केलेलं नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai bachchan shredder her daughter aaradhya birthday party and father krishna ray birth anniversary photos on instagram rsj