Aishwarya Rai Bachchan post for Abhishek Bachchan : मागील वर्षभरापासून बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन व त्याची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या राय त्यांच्या नात्यामुळे चर्चेत राहिले. या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा होत्या. या चर्चांसाठी निमित्त अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचं लग्न ठरलं होतं. या लग्नातील कार्यक्रमांना हे दोघेही वेगवेगळे आले होते, तसेच ऐश्वर्याच्या वाढदिवसाला बच्चन कुटुंबातील कोणतेही सदस्य दिसले नव्हते, तसेच कोणीही तिच्यासाठी पोस्टदेखील केली नव्हती. पण आता अभिषेकसाठी ऐश्वर्याने केलेल्या खास पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिषेक बच्चनचा बुधवारी (५ फेब्रुवारीला) ४९ वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने ऐश्वर्या रायने पतीचा बालपणीचा एक फोटो शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ऐश्वर्याने अभिषेकचा बालपणीचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो खेळण्यातील कारमध्ये बसला आहे आणि स्टिअरिंगला घट्ट पकडलं आहे. या फोटोत ज्युनियर बच्चन खूपच निरागस दिसत आहे. हा क्यूट फोटो शेअर करून ऐश्वर्याने खास कॅप्शनही दिलं आहे. ‘तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला आनंद, चांगले आरोग्य, प्रेम लाभो. गॉड ब्लेस यू!’ अशा आशयाचं कॅप्शन ऐश्वर्याने या फोटोला दिलं आहे.

पाहा पोस्ट

ऐश्वर्या व अभिषेक यांच्या नात्याबद्दल विविध प्रकारच्या चर्चा होत होत्या. त्यामुळे या दोघांपैकी कोणाच्याही सकारात्मक प्रतिक्रियेची व पोस्टची चाहते बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना खूप दिवसांपासून उधाण आलं होतं. मध्यंतरी मुलगी आराध्याच्या शाळेत ऐश्वर्या व अभिषेक एकत्र दिसले होते. त्यानंतर एका लग्नात ऐश्वर्या व अभिषेक तसेच त्याच्या सासूबाई वृंदा राय एकत्र दिसल्या होत्या. त्यामुळे या दोघांच्या घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. नुकतेच ऐश्वर्या व अभिषेक लेक आराध्याबरोबर विमानतळावर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले होते.

ऐश्वर्या व अभिषेक १८ वर्षांपासून एकत्र आहेत. ऐश्वर्या रायने २० एप्रिल २००७ रोजी अभिषेक बच्चनबरोबर एका शाही सोहळ्यात लग्न केलं होतं. ऐश्वर्या आणि अभिषेकला आराध्या बच्चन नावाची मुलगी असून तीही नेहमीच चर्चेत असते. आराध्या अनेक कार्यक्रमांना आई ऐश्वर्याबरोबर हजेरी लावत असते.