अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन मागील काही महिन्यांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. दोघांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा सातत्याने होत आहे. ते वेगळे राहत असल्याचंही म्हटलं जात आहे. यासंदर्भात अद्याप अभिषेक, ऐश्वर्या किंवा बच्चन कुटुंबाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नुकतंच अभिषेकने ऐश्वर्याचं कौतुक केलं होतं आणि तिचे आभार मानले होते. अशातच ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओने लक्ष वेधले आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या महिला अत्याचाराविरोधात बोलताना दिसतेय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐश्वर्या रायने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती रस्त्यांवरून जाताना महिलांबरोबर छेडछाडीच्या घटना घडतात, त्याबाबत बोलत आहे. ऐश्वर्या एका कॉस्मेटिक ब्रँडची अॅम्बेसिडर आहे. त्यांच्यासाठी तिने हा व्हिडीओ शूट केला आहे. यात ती महिलांना स्वतःला कमी न लेखण्याचा सल्ला देत आहे. तसेच तिने लोकांना महिला अत्याचारांविरोधात उभं राहण्याचं आवाहन केलं आहे.

हेही वाचा – मलायका अरोरानंतर आणखी एका बॉलीवूड अभिनेत्रीचं ब्रेकअप; म्हणाली, “इतकी वर्षे झाली, मी…”

व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय काय म्हणाली?

व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय एका महत्त्वाच्या विषयावर बोलताना दिसतेय. “रस्त्यावर होणाऱ्या छेडछाडीचा सामना कसा करावा? नजर झुकवायची? नाही. थेट त्याकडे पाहा. ताठ मानेनं चाला. आपलं शरीर अमूल्य आहे, त्यामुळे त्याबद्दल कधीच तडजोड करू नका. स्वतःला कमी लेखू नका. स्वतःसाठी उभ्या राहा. तुमच्या ड्रेस किंवा लिपस्टिकला दोष देऊ नका. ‘स्ट्रीट हरॅसमेंट’ ही कधीच तुमची चूक नसते,” असं ऐश्वर्या राय या व्हिडीओत म्हणतेय.

हेही वाचा – अभिषेक बच्चन घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान पहिल्यांदाच ऐश्वर्या रायबद्दल म्हणाला, “मला माहीत आहे की ऐश्वर्या…

ऐश्वर्या रायच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ऐश्वर्याने जे व्हिडीओत म्हटलंय, त्याचं अनेकांनी समर्थन केलं आहे. ती जे म्हणतेय ते पूर्णपणे बरोबर आहे, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

नुकतेच अभिषेक बच्चनने मानले ऐश्वर्याचे आभार

ऐश्वर्या आराध्याची काळजी घेत असल्याने काम करू शकत असल्याचं अभिषेक म्हणाला. “मी नशीबवान आहे की मला बाहेर जाऊन चित्रपट करायला मिळतात; कारण मला माहीत आहे की ऐश्वर्या आराध्यासोबत घरी आहे आणि त्याबद्दल मी तिचे मनापासून आभार मानतो,” असं अभिषेक बच्चन ‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai bachchan talks about women street harassment amid divorce rumors hrc