अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नुकतीच पती अभिषेक बच्चन व मुलगी आराध्याबरोबर मुंबई एअरपोर्टवर दिसली. पण तिच्या एअरपोर्ट लूकने नेटकऱ्यांची निराशा केली आहे. शुक्रवारी रात्री तिला पापाराझींनी मुंबई एअरपोर्टवर कॅमेऱ्यात कैद केलं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर नेटकरी ऐश्वर्याच्या लूकवर कमेंट्स करताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिनाक्षी शेषाद्रीचा पती कोण, मुलं किती? ती सध्या काय करते? जाणून घ्या

ऐश्वर्याला स्टाइल सेन्सवरून काहींनी ट्रोल केलं. तर काहींनी आराध्याच्या हेअर स्टाइलवरून कमेंट्स केल्या आहेत. ऐश्वर्याने यावेळी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. “मला ऐश्वर्या आवडते पण तिच्या स्टाईलचं काय चाललं आहे हे मला माहीत नाही,” अशी कमेंट एकाने केली आहे.

“या दोघी मायलेकींच्या हेअरस्टाइलशिवाय काहीच पर्मनंट नाही”, अशी कमेंट एका युजरने केली आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, ऐश्वर्याच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती अखेरची ‘पोन्नियिन सेल्वन २’ या चित्रपटात दिसली होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. चित्रपटाला समीक्षक व प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.