Aishwarya Rai Bachchan Video: बच्चन कुटुंबाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. गेले अनेक महिने ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या; त्याच दरम्यान हे दोघेही एकत्र लेकीच्या शाळेत पोहोचले. त्यांच्याबरोबर बिग बी अमिताभ बच्चनदेखील होते. आराध्याच्या शाळेत दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या व अभिषेक यांच्याबरोबर वृंदा राय आल्या होत्या.
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अॅन्युअल डे सेलिब्रेशनसाठी गुरुवारी (१९ डिसेंबरला) शाहरुख खान, करीना कपूर, शाहीद कपूर, सैफ अली खान यांनी हजेरी लावली होती. ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चनदेखील लाडक्या लेकीचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी ऐश्वर्याची आई वृंदा राय आराध्याच्या शाळेत गेल्या होत्या.
हेही वाचा – आराध्या-अबरामचा मंचावर, तर विद्यार्थ्यांबरोबर शाहरुख खान अन् अभिषेक बच्चनचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
सेलिब्रेशन संपल्यानंतर वृंदा राय, ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन एकत्र पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाल्या. यावेळी ऐश्वर्या व आराध्या वृंदा राय यांची काळजी घेताना दिसल्या. अभिषेक बच्चनही तिथेच होता. ऐश्वर्या व आराध्या दोघींनी वृंदा राय यांना त्यांच्या कारमध्ये बसवलं आणि त्यानंतर त्या कारने घरी गेल्या. या तीन पिढ्यांना एकत्र पाहून फिल्मीज्ञानच्या व्हिडीओवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
हेही वाचा – करीना कपूर-शाहिद कपूर बऱ्याच वर्षांनी दिसले एकत्र; फोटो पाहून चाहते म्हणाले, “गीत व आदित्य…”
पाहा व्हिडीओ –
‘ऐश्वर्या राय बच्चन ही आदर्श सून, आदर्श मुलगी व आदर्श आई आहे’, अशी कमेंट एका युजरने या व्हिडीओवर केली आहे. ‘ऐश्वर्याने तिच्या मुलीला खूप चांगले संस्कार दिले आहेत’, असं एका युजरने म्हटलं आहे. अनेकांनी या व्हिडीओवर रेड हार्ट इमोजीदेखील कमेंट केले आहेत. ऐश्वर्याचा आई व मुलीबरोबरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
हेही वाचा – नाना पाटेकर यांच्या पत्नीला पाहिलंत का? फक्त ७५० रुपयांत केलेलं लग्न; ‘अशी’ झालेली दोघांची पहिली भेट
दरम्यान, अॅन्युअल डेच्या पहिल्या दिवशी आराध्याने शाहरुख खानचा मुलगा अबरामबरोबर परफॉर्म केलं. या दोघांचा परफॉर्मन्स ऐश्वर्या राय व शाहरुख खान यांनी त्यांच्या फोनमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर शाहरुखच्या ‘ओम शांती ओम’मधील ‘दिवानगी दिवानगी’ गाण्यावर अभिषेक बच्चन व शाहरुख खान यांनी शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर मनसोक्त डान्स केला.