Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या राय-बच्चन कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. सध्या ती आपल्या लेकीबरोबर जगभरातील कार्यक्रमांमध्ये दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या आराध्याबरोबर दुबईत झालेल्या ‘साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवार्ड्स’ (SIIMA 2024) या पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळाली. यावेळी तिला ‘पोन्नियिन सेलवन: २’ या चित्रपटासाठी समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. निर्माता कबीर खानच्या हस्ते ऐश्वर्याला गौरविण्यात आलं. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

SIIMA 2024 या पुरस्कार सोहळ्यातील आराध्याच्या एका व्हिडीओची चर्चा अधिक रंगली. या व्हिडीओमध्ये आराध्या दाक्षिणात्य सुपरस्टार डॉ. शिवा राजकुमारला हात न मिळवता पाया पडताना दिसली. त्यामुळे तिचं आणि ऐश्वर्याने दिलेल्या संस्काराचं खूप कौतुक केलं. अशातच अभिनेत्रीचा एक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यामधून तिने घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य

गेल्या कित्येक महिन्यांपासून ऐश्वर्या व अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाविषयी बोललं जात आहे. बऱ्याच काळापासून दोघं एकत्र न दिसल्यामुळे घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. पण आता या चर्चांना ऐश्वर्या राय-बच्चनने ( Aishwarya Rai Bachchan ) आपल्या कृतीतून उत्तर दिलं आहे.

हेही वाचा – Video: निक्की विरुद्ध घर, कधी कामावरून तर कधी अरबाज घरातून जाताना झालेल्या ड्रामावरून सदस्य करतायत चर्चा, म्हणाले…

पॅरिस फॅशन वीकमधील ऐश्वर्याचा हा व्हिडीओ आहे. आपल्या लेकीबरोबर ऐश्वर्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाला ऐश्वर्याने काळ्या पँटवर एक लांब कोट परिधान केला होता. तर आराध्याने गुलाबी रंगाचं स्वेटशर्ट आणि डेनिम परिधान केली होती. याच वेळी ऐश्वर्याने आपल्या कृतीतून घटस्फोटाच्या चर्चांवर उत्तर दिलं. ही कृती म्हणजे तिने दाखवलेली लग्नाची अंगठी. पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या ( Aishwarya Rai Bachchan ) लग्नाची वी-शेपवाली अंगठी घालून फ्लॉट करताना दिसली. याच लग्नाच्या अंगठीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

Aishwarya Rai Bachchan
Aishwarya Rai Bachchan

एवढंच नव्हे तर पॅरिस फॅशन वीकमध्ये वॉक करताना देखील ऐश्वर्याच्या बोटात अंगठी पाहायला मिळाली. त्यामुळे आता घटस्फोटाची अफवा असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच अभिषेकबरोबर पॅचअप झाल्याचं बोललं जात आहे. त्यांचा घटस्फोट झाला नसून फक्त वाद आहेत. पण हे वाद लवकरच संपुष्टात येईल अशी आशा नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – “Unfair झालं”, ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर आल्यानंतर अरबाज पटेलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, “मी स्वतःला विजेता…”

दरम्यान, ऐश्वर्या राय-बच्चनच्या ( Aishwarya Rai Bachchan ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची ‘पोन्नियिन सेलवन: २’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने दुहेरी भूमिका साकारली आहे. नंदिनी आणि मंदाकिनी देवी या दोन भूमिकेत ऐश्वर्या झळकली आहे. एका तामिळ कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहेत. या चित्रपटात ऐश्वर्या व्यतिरिक्त कार्ती, जयम रवी, त्रिशा, जयराम, प्रभू, आर सरथकुमार, शोभिता धुलिपाला, ऐश्वर्या लक्ष्मी, विक्रम प्रभू, प्रका राज, रहमान आणि आर पार्थिवन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Story img Loader