दिग्दर्शक राजकुमार हिरानींच्या ‘३ इडियट्स’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार राजकुमार हिरानींबरोबर काम करण्यासाठी उत्सुक असतात. परंतु एके काळी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाबरोबर काम करण्यास नकार दिला होता.

हेही वाचा : “फिर और क्या चाहिए…” विकी-साराने शेअर केला रोमॅंटिक व्हिडीओ, नेटकरी म्हणाले, “कतरिना तुला…”

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने दिग्दर्शक राजकुमार हिरानींच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. राजकुमार हिरानींनी ऐश्वर्याला ‘डॉक्टर सुमन’च्या मुख्य भूमिकेसाठी विचारले होते. दिग्दर्शकांनी ऐश्वर्याला स्क्रिप्टसुद्धा दाखवली होती आणि तिला या चित्रपटाची संपूर्ण कथा आवडली होती. परंतु काही वैयक्तिक कारणांसाठी ऐश्वर्याने संजय दत्तबरोबर काम करण्यास नकार कळवला आणि निर्मात्यांनी नव्या अभिनेत्रीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

हेही वाचा : “‘बजरंगी भाईजान’च्या क्लायमॅक्समध्ये…” एस. एस. राजामौलींनी दिला होता ‘तो’ सल्ला, म्हणाले, “शेवटी सलमान…”

ऐश्वर्याने नकार कळवल्याने दिग्दर्शक राजकुमार हिरानींनी या भूमिकेबद्दल ग्रेसी सिंगला विचारले. ग्रेसीने साकारलेल्या ‘डॉक्टर सुमन’च्या भूमिकेला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपट आता प्रेक्षक ओटीटीवरही पाहू शकतात. प्रेक्षकांनी आयएमडीबीवर या चित्रपटाला १० पैकी ८.१ एवढे रेटिंग दिले आहे.

आता ‘डंकी’ चित्रपटाच्या निमित्ताने राजकुमार हिरानी तब्बल चार वर्षांनी बॉक्स ऑफिसवर पुनरागमन करणार आहेत. ‘डंकी’ चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिका साकारणार असून, या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

Story img Loader