बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन अशा काही निवडक अभिनेत्रींपैकी आहे ज्यांच्याकडे अभिनयाची कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही स्वतःच्या दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनय क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. १ नोव्हेंबरला ऐश्वर्या राय बच्चन ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न करण्याआधी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण लग्नानंतर तिने फार कमी चित्रपटांमध्ये काम केलं. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे करण जोहरचा ‘ऐ दिल है मुश्किल’. ज्या चित्रपटातील काही सीन केवळ बच्चन कुटुंबाच्या नाराजीमुळे कापण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूरसह ऐश्वर्या राय बच्चन मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट ऐश्वर्यासाठी खास होता कारण लग्न आणि मुलगी आराध्याचा जन्म यानंतर ऐश्वर्या बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करत होती. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर बच्चन कुटुंब मात्र फारसं खुश नव्हतं. कारण होतं ऐश्वर्यांने या चित्रपटात रणबीरसह दिलेले बोल्ड सीन. ज्यामुळे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन खूपच नाराज झाले होते.

आणखी वाचा- “मला अशी बायको नकोय…” लग्नाआधी अमिताभ यांनी जया बच्चन यांना ऐकवला होता निर्णय

ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांच्या ‘ऐ दिल है मुश्किल’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर बच्चन कुटुंबाने करण जोहरकडे ही नाराजी बोलून दाखवल्याचंही म्हटलं जातं. ऐश्वर्यांने या चित्रपटात रणबीरसह लिपलॉक सीन दिला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, “विवाहित ऐश्वर्याने स्वतःपेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्याबरोबर बोल्ड सीन देणं योग्य नाही.” असं बच्चन कुटुंबांचं म्हणणं होतं आणि त्यांच्या सांगण्यानुसार या चित्रपटातील काही सीन्स कापण्यातही आले होते. एवढंच नाही तर जेव्हा ऐश्वर्या आणि रणबीरच्या हॉट फोटोशूटचे फोटो समोर आल्यानंतर सर्व हैराण झाले होते.

आणखी वाचा- “नातं टिकण्यासाठी शरीरसंबंध…” जया बच्चन यांचं वैवाहिक आयुष्यावर बोल्ड वक्तव्य

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ऐश्वर्याचा बिनधास्त आणि बोल्ड अंदाज पाहून सासू-सासरे जया बच्चन आणि अमिताभ बच्चन खूप नाराज झाले होते. त्यांनी ही नाराजी ऐश्वर्यालाही बोलून दाखवली होती. ज्यामुळे बच्चन कुटुंबात वादही झाले होते कारण सासू-सासऱ्यांना पटलं नसलं तरी ऐश्वर्याच्या मते यात काहीच चुकीचं नव्हतं. अर्थात यानंतर ऐश्वर्या पुन्हा कोणत्याच चित्रपटात बोल्ड अंदाजात दिसली नाही. त्यानंतर तिने केवळ ‘फन्ने खां’ चित्रपट केला. दरम्यान अलिकडेच प्रदर्शित झालेला तिचा ‘पोन्नियिन सेल्वन’ बराच गाजला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai birthday bachchan family got angry after seen actress bold look in ae dil hai mushkil mrj