अभिषेक व ऐश्वर्या राय-बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन ही बॉलीवूडची अशी स्टार किड्स आहे, जी नेहमी चर्चेत असते. आराध्या नेहमी ऐश्वर्याबरोबर विविध कार्यक्रमात पाहायला मिळते. पण यादरम्यान ती एकाच हेअरस्टाइलमध्ये दिसते. त्यामुळे बऱ्याच काळापासून ऐश्वर्याच्या चाहत्यांना आराध्याला नव्या हेअरस्टाइलमध्ये पाहण्याची इच्छा होती. अभिनेत्रीच्या प्रत्येक व्हायरल व्हिडीओवर चाहते आराध्याच्या हेअरस्टाइलविषयी बोलायचे. अखेर तो क्षण आला. आराध्या पहिल्यांदाच वेगळ्या हेअरस्टाइलमध्ये झळकली. याच निमित्त होतं तिच्या शाळेचा कार्यक्रम.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आराध्या ही धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेची विद्यार्थीनी आहे. काल या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अनेक सेलिब्रिटींच्या मुलांनी कला सादर केली. शाहरुख खान मुलगा अबराम, करिना कपूरचा मुलगा तैमुर, करण जोहरचा मुलगा-मुलगी यश-रुही अशा सेलिब्रिटींच्या मुलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी आराध्या बच्चनने देखील आपलं अभिनय कौशल्य दाखवलं. यासाठी तिने वेगळा लूक केला होता. काळ्या रंगाच्या स्टायलिशन ड्रेसमध्ये आणि पहिल्यांदाच वेगळ्या हेअरस्टाइलमध्ये आराध्या पाहायला मिळाली. तिचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – Video: किंग खानच्या चित्रपटातील सीन्स रिक्रिएट ते आयकॉनिक पोज, पाहा शाहरुख खानच्या १० वर्षाच्या लेकाचा अभिनय

आराध्याचा नवा लूक काही जणांना आवडला आहे. तसेच काही जण तिच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ पेजवर कार्यक्रमानंतर बच्चन कुटुंबीयांचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये आराध्याचा नवा लूक पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – लक्ष्मीकांत बेर्डे: चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कलावंत

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकरीने लिहिलं आहे, “१२ वर्षांनंतर आराध्याचं कपाळ दिसलं का? अविश्वसनीय…” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “अखेर आराध्याचं कपाळ दिसलं.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “ओएमजी कपाळ दिसलं.” चौथ्या नेटकरीनं लिहिलं, “अखेर तो दिवस आलाच.”

दरम्यान, शाळेच्या या कार्यक्रमात आराध्याला प्रोत्साहन देण्यासाठी बच्चन कुटुंब उपस्थित राहिलं होतं. अभिषेक-ऐश्वर्याबरोबर अमिताभ बच्चन यांनी नातीचं काम पाहण्यासाठी हजेरी लावली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai daughter aaradhya bachchan change her hairstyle for school annual day video viral pps