Aishwarya Rai Drops Bachchan Surname: बॉलीवूडमधील सर्वात सुंदर व प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ऐश्वर्या राय होय. तिच्या अभिनयाचे, सौंदर्याचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या तिच्या कामामुळे नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिच्या व अभिषेक बच्चनच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. अशातच दुबईतील एका इव्हेंटमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐश्वर्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर तिने बच्चन आडनाव हटवल्याची चर्चा होत आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात.

हेही वाचा – अभिषेक बच्चन घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान पहिल्यांदाच ऐश्वर्या रायबद्दल म्हणाला, “मला माहीत आहे की ऐश्वर्या…”

ऐश्वर्या रायने हटवलं ‘बच्चन’ आडनाव?

ऐश्वर्या राय नुकतीच दुबईतील ग्लोबल वुमेन फोरम कार्यक्रमात सहभागी झाली. यात तिने महिला सशक्तीकरणाबद्दल तिची मतं मांडली. या कार्यक्रमात ऐश्वर्या निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान करून गेली होती. यावर तिने नक्षीदार जॅकेट घातलं होतं. ऐश्वर्याचा या इव्हेंटमधील एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ऐश्वर्या मंचावर येताच मोठ्या स्क्रीनवर तिचं नाव दिसतं. मात्र त्यात बच्चन हे तिचं आडनाव नव्हतं. ‘ऐश्वर्या राय’ व ‘इंटरनॅशनल स्टार’ असं तिथे लिहिलं होतं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर ऐश्वर्याच्या नावामागे बच्चन आडनाव नाही, याकडे लोकांचं लक्ष वेधलं गेलं.

हेही वाचा – “खूप झालंय आता, मला…”; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चन असं का म्हणाला?

ऐश्वर्या रायचे इन्स्टाग्रामवर नाव ऐश्वर्या राय बच्चन असेच आहे. तसेच ती पती अभिषेक बच्चनला इन्स्टाग्रामवर फॉलोदेखील करते. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त तिने आराध्याचा आजोबांबरोबरचा फोटोदेखील शेअर केला होता. त्यामुळे या इव्हेंटमध्ये तिच्या नावाबरोबर बच्चन आडनाव नसणं हे नेमकं तिच्या व अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान घडलं आहे. मात्र तिने अधिकृतरित्या बच्चन आडनाव हटवलेलं नाही.

हेही वाचा – ‘बाहुबली’ फेम अभिनेता ४७ व्या वर्षी अडकला लग्नबंधनात, पत्नीबरोबरचा समुद्रकिनाऱ्यावरील फोटो केला शेअर

अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा

ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा मागील काही महिन्यांपासून सातत्याने होत आहे. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नात अभिषेक बच्चन कुटुंबाबरोबर आला होता. तर ऐश्वर्या राय तिथे थोड्या वेळाने लेक आराध्याबरोबर आली होती. त्यानंतर या दोघांच्या नात्यात सगळं आलबेल नसल्याचं म्हटलं जाऊ लागलं.

हेही वाचा – शुभमंगल सावधान! लोकप्रिय अभिनेत्याने अभिनेत्री पूजा जोशीशी बांधली लग्नगाठ, थाटामाटात पार पडला सोहळा

नुकताच आराध्याचा १३ वा वाढदिवस झाला. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. मात्र या फोटोंमध्ये अभिषेक बच्चन किंवा कुटुंबातील इतर कोणतेही सदस्य नव्हते, त्यामुळे परत एकदा या जोडप्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय. त्यात आता या कार्यक्रमात तिच्या नावासमोर बच्चन आडनाव नसल्याने आणखी चर्चांमध्ये आणखी भर पडली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai drops bachchan surname dubai video viral hrc