अभिषेक बच्चनने एकदा बहीण श्वेता बच्चन नंदाबरोबर करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. या एपिसोडमधील एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे. त्यामध्ये करण श्वेताला भाऊ अभिषेक व वहिनी ऐश्वर्या राय यांच्यापैकी कोण चांगला अभिनय करतं, असं विचारण्यात आलं. त्यावर श्वेताने कोणाचं नाव घेतलं होतं, ते जाणून घेऊयात.

Video: बिग बी आले, विहीणबाईंना भेटले अन्…; अनफॉलो केल्याच्या चर्चांनंतर अमिताभ बच्चन व ऐश्वर्या राय समोर आल्यावर काय घडलं?

करण जोहरने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना श्वेता तिचा भाऊ अभिषेक बच्चनचे नाव घेते. तिच्यामते ऐश्वर्यापेक्षा अभिषेक बच्चन चांगला अभिनेता आहे. या मुलाखतीत श्वेताने ऐश्वर्याबद्दल न आवडणारी गोष्टही सांगितली होती. “ऐश्वर्या सेल्फ मेड, मजबूत महिला आहे आणि खूप चांगली आई आहे. पण ती कधीच कॉल आणि मेसेजेसना वेळेवर उत्तर देत नाही ही तिची गोष्ट मला अजिबात आवडत नाही,” असं श्वेताने म्हटलं होतं.

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या राय अन् अभिषेक बच्चन दिसले एकत्र; आराध्याच्या शाळेतील कार्यक्रमाला लावली हजेरी

दरम्यान, ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यात सगळं आलबेल नसल्याच्या चर्चा खूप दिवसांपासून होत आहेत. अशातच अभिषेक व ऐश्वर्याने एकत्र मुलगी आराध्याच्या शाळेतील कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन व त्यांचा नातू अगस्त्य नंदादेखील उपस्थित होते. अभिषेक व ऐश्वर्या एकाच कारने शाळेत पोहोचले होते, नंतर मुलीला घेऊन ते एकत्र गेले होते. त्यामुळे ऐश्वर्या व अभिषेकच्या नात्याबद्दल सुरू असलेल्या चर्चा या निव्वळ अफवा असल्याचं दिसतंय.

Story img Loader