मागील जवळपास वर्षभरापासून अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांच्या नात्यात सगळं आलबेल नसल्याच्या चर्चा होत्या. ऐश्वर्या फक्त आराध्याबरोबर असायची, तर अभिषेक त्याच्या कुटुंबाबरोबर असायचा. अनेकदा एकाच ठिकाणी हे वेगवेगळे पोहोचायचे, त्यामुळे अभिषेक व ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा आला आहे, ते ग्रे डिव्हॉर्स घेणार आहेत; अशा गोष्टी बोलल्या जात होत्या. पण मागील काही दिवसांत दोन-तीन वेळा हे दोघेही पुन्हा एकदा एकत्र दिसले, त्यामुळे त्यांचे चाहते खुश झाले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन नुकतेच आराध्याच्या शाळेतील अॅन्युअल डे कार्यक्रमासाठी एकत्र गेले होते. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात एक दिवस त्यांच्याबरोबर अमिताभ बच्चन होते, तर दुसऱ्या दिवशी ऐश्वर्याची आई वृंदा राय आल्या होत्या. दोन दिवस आराध्याच्या शाळेत अभिषेक-ऐश्वर्या एकत्र दिसले. त्यानंतर एका लग्नात दोघांनी एकत्र हजेरी लावली होती, त्या लग्नातील त्यांचा वृंदा राय यांच्याबरोबरचा सेल्फी व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा ऐश्वर्या व आराध्या त्यांच्या लेकीबरोबर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले.

हेही वाचा – एक पारशी, एक मुस्लीम, एक शीख आणि एका हिंदूचे निधन…; अमिताभ बच्चन यांची ‘ती’ पोस्ट, नेटकऱ्यांच्या भावुक कमेंट्स

अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय आराध्याबरोबर नवीन वर्षानिमित्त परदेशात गेले होते. ते परदेशातून परतल्यावर मुंबई विमानतळावर पापाराझींशी त्यांनी संवाद साधला. तसेच त्यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ऐश्वर्या तिचं सामान घेऊन मराठीत ‘चला चला’ म्हणताना दिसली. अभिषेकने बायको व लेकीसाठी कारचा दरवाजा उघडला आणि नंतर ते तिघेही एकाच कारने निघून गेले. वूम्प्ला या अकाउंटवरून त्यांचे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 18 फेम विवियन डिसेनाच्या पहिल्या बायकोने एका महिन्यात सोडली मालिका, ७ वर्षांनी केलेलं पुनरागमन; नेमकं काय घडलं?

पाहा व्हिडीओ-

हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. काहींनी या दोघांना एकत्र पाहून आनंद झाला, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी अभिषेकचं निम्रत कौरशी अफेअर आहे, ही बातमी खोटी होती, असं म्हटलं आहे. अनेक चाहते व्हिडीओवर रेड हार्ट इमोजी कमेंट करत आहेत.

हेही वाचा – “खोटं बोलून, माझं नाव वापरून…”, अंकिता प्रभू वालावलकर भडकली; म्हणाली, “आमच्या लग्नासाठी…”

दरम्यान, जुलै २०२४ मध्ये अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नात अभिषेक बच्चन त्याचे आई-वडील जया बच्चन व अमिताभ बच्चन तसेच बहिणीच्या कुटुंबाबरोबर पोहोचला होता. तर, त्याच ठिकाणी ऐश्वर्या राय काही वेळाने पोहोचली होती. सलग दोन दिवस असं घडलं होतं, त्यानंतर या दोघांच्या नात्यात सगळं सुरळीत नसल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं होतं. दक्षिणेत पार पडलेल्या एका अवॉर्ड सोहळ्यासाठीही ऐश्वर्या आराध्याला घेऊन गेली, त्यांच्याबरोबर बच्चन कुटुंबातील कोणीच नव्हतं. तसेच ऐश्वर्याने पोस्ट केलेल्या आराध्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या फोटोंमध्येदेखील अभिषेक बच्चन नव्हता. पण गेले काही दिवस हे दोघेही एकत्र दिसत असल्याने त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai says chala chala in marathi she return with abhishek bachcha daughter aaradhya video viral hrc