Aishwarya Rai Bachchan and Abhishek Bachchan: सध्या मुकेश अंबानी व नीता अंबानींचा मुलगा अनंतच्या लग्नाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. १२ जुलैला अनंत अंबानीने राधिका मर्चंटशी (Anant Ambani Wedding) लग्नगाठ बांधली. जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये पारंपरिक हिंदू रिती-रिवाजानुसार अनंत-राधिकाचा लग्नसोहळा पार पडला. या शाही लग्नसोहळ्याला देश-विदेशातील दिग्गज मंडळींनी खास हजेरी लावली होती. तसंच बॉलीवूडच्या सेलिब्रिटींची देखील मांदियाळी पाहायला मिळाली. पण अनंत-राधिकाच्या लग्नातील बच्चन कुटुंबाच्या काही फोटो आणि व्हिडीओमुळे ऐश्वर्या-अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं. मात्र या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम देणारा अनंत-राधिकाच्या लग्नातील दोघांचा एक फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू होती. अखेर १२ जुलैला अनंत-राधिका लग्नबंधनात अडकले. एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट आता अंबानींची धाकटी सून झाली आहे. या सोहळ्याला बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटींनी खास हजेरी लावली होती. महानायक अमिताभ बच्चन, जया बच्चन, रेखा, शाहरुख खान, सलमान खान, प्रियांका चोप्रा, माधुरी दीक्षित, रणवीर कपूर, रणबीर सिंह, आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, विकी कौशल, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, सारा अली खान, रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख अशा अनेक कलाकारांनी अनंत-राधिकाच्या लग्नात खास उपस्थित राहिले होते.

हेही वाचा – Emraan Hashmi: “मला ऐश्वर्या राय-बच्चनची माफी मागायची आहे”, इमरान हाश्मीला अभिनेत्रीसंबंधित ‘त्या’ वक्तव्यामुळे झाला पश्चाताप, म्हणाला…

पण अनंत-राधिकाच्या लग्नाला येताना बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्या राय-बच्चन, आराध्या एकत्र आले नव्हते. आधी बच्चन कुटुंब म्हणजेच अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन, श्वेता बच्चन, जावई निखिल नंदा, नातू अगस्त्य नंदा, नात नव्या नवेली असे एकत्र आले. त्यानंतर ऐश्वर्या राय-बच्चन आपली लाडकी लेक आराध्याबरोबर लग्नात पोहोचली. यामुळेच ऐश्वर्या व अभिषेकदरम्यान नाराजी असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. शिवाय घटस्फोटाच्याही चर्चा रंगल्या आहेत. अशातच ऐश्वर्या-अभिषेकचा अनंत अंबानीच्या लग्नातील एक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतं आहे.

अनंत अंबानीच्या लग्नातील या व्हायरल फोटोमध्ये ऐश्वर्या-अभिषेक एकत्र असल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोत, ऐश्वर्या अभिषेकच्या समोर उभी असल्याचं दिसत आहे. तर अभिषेकच्या एका बाजूला आराध्या आणि दुसऱ्या बाजूला अभिनेता हृतिक रोशन बसलेला पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Shah Rukh Khan and Salman Khan Dance: अनंत अंबानीच्या वरातीत करण-अर्जुनचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

Aishwarya Rai Bachchan and Abhishek Bachchan
ऐश्वर्या राय बच्चन- अभिषेक बच्चन (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

तसंच व्हायरल व्हिडीओमध्ये देखील ऐश्वर्या अभिषेकच्या शेजारी बसलेली दिसत. तिच्या बाजूलाच आराध्या देखील पाहायला मिळत आहे. अनंत अंबानीच्या लग्नातील या फोटो आणि व्हिडीओमुळेच ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लागला असून चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा – Anant-Radhika Wedding: अजय-अतुल, श्रेया घोषलचा लाईव्ह परफॉर्मन्स अन् राधिका मर्चंटची सुंदर रथातून मंडपात ग्रँड एन्ट्री; तर अनंत अंबानी…

ऐश्वर्या बच्चन कुटुंबातील ‘याच’ सदस्याला इन्स्टाग्रामवर करते फॉलो

दरम्यान, गेल्या बऱ्याच दिवसांपासून ऐश्वर्या व अभिषेकच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. इन्स्टाग्रामवर ऐश्वर्या फक्त अभिषेकलाच फॉलो करते. बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्याला फॉलो करत नाही. सासरे अमिताभ बच्चन यांना देखील ऐश्वर्या फॉलो करत नाही आणि त्यांच्याबरोबर ती जास्त दिसतही नाही. कोणताही कार्यक्रम असो ऐश्वर्या सासरच्यांपासून दूर-दूर असते. त्यामुळेच ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांना नेहमी उधाण येत असतं.

Story img Loader