अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन ही बाॅलीवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. २० एप्रिल २००७ रोजी दोघं लग्नबंधनात अडकले. परंतु, गेल्यावर्षीपासून ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटच्या अफवा पसरत आहेत. काल ५ फेब्रुवारीला अभिषेकचा वाढदिवस होता. ऐश्वर्याने अभिषेकला शुभेच्छा देत या अफवेवर पूर्णविराम दिला आहे. ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत अभिषेकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

ऐश्वर्याने त्यांच्या कुटुंबाचा आणि अभिषेकच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. यात पहिला फोटो कुटुंबाचा आहे, ज्यात ऐश्वर्या, अभिषेक आणि त्यांची लेक आराध्या लाल रंगाच्या मॅचिंग कपड्यांवर दिसत आहेत; तर दुसरा अभिषेकचा बालपणीचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. या फोटोला कॅप्शन देतं ऐश्वर्याने अभिषेकला शुभेच्छा दिल्या, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, देव तुला खूप आनंद, प्रेम, शांती आणि उत्तम आरोग्य देवो”, असं ऐश्वर्याने लिहिलं आहे.

abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
why Shatrughan Sinha married Poonam despite his affair with Reena Roy
रीना रॉयबरोबर अफेअर असूनही पूनमशी लग्न का केलं? शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले, “निर्णय घेणं…”
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : नाही तर ईडी, सीबीआय आहेतच!
Hasan Mushrif f
चूक भाजपाची अन् माफी मुश्रीफांना मागावी लागली, नेमकं प्रकरण काय? म्हणाले, “आमच्या मनातही…”
Manoj Bajpayee
‘या’ प्रसिद्ध चित्रपटाच्या दिग्दर्शकाबरोबर मनोज वाजपेयी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार; म्हणाले, “आनंदाची बातमी…”
Aishwarya Rai Abhishek Bachchan Photo:
चेहऱ्यावर गोड हास्य अन् ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनबरोबर घेतला सेल्फी; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान दोघांचा फोटो Viral

हेही वाचा… जान्हवी कपूरने बॉयफ्रेंडच्या आईला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, वीर पहारियाच्या फोटोवर केलेली कमेंट चर्चेत

अभिषेकची बहीण श्वेता बच्चननेसुद्धा सोशल मीडियावर तिचा आणि अभिषेकचा जुना फोटो शेअर केला. हा दोघांचा बालपणीचा फोटो आहे, यात आभिषेक आणि श्वेता सोफ्यावर बसलेले दिसत आहेत आणि त्यांच्या हातात कॅंडी आहे. श्वेता प्रेमळपणे अभिषेककडे पाहताना दिसतेय. या फोटोला कॅप्शन देत श्वेता म्हणाली, “हे फक्त तुला आणि मलाच माहीत आहे. माझ्या लहान भावा, हा तुझा मोठा दिवस आहे – आशा आहे की तुला गाणे आवडेल. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.”

टाइम्स ऑफ इंडियाच्या मुलाखतीत अभिषेक म्हणाला की, त्याला वाढदिवसादिवशी त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडतं. तसंच त्याला या दिवशी कामही करायला आवडतं. पुढे तो म्हणाला की, “आराध्यासाठी तो दिवस खास असतो. मला शक्य असल्यास माझा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा करायला मला आवडतं. पण, जर मी काम करत नसेन तर तो दिवस माझ्यासाठी इतका आनंदाचा नसतो.”

हेही वाचा… ऐश्वर्या-अभिषेकच्या ‘या’ चित्रपटानंतर अमिताभ बच्चन यांना आला होता खूप राग; ‘हे’ होते कारण

ऐश्वर्याचे कौतुक करत अभिषेक म्हणाला, “एक उत्कृष्ट आई होण्याचे सर्व श्रेय ऐश्वर्याला जाते. पितृत्वाने माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. मुलाला या जगामध्ये आणल्यानंतर आपलं प्राधान्य बदलतं. मला खात्री आहे की, या विधानाशी प्रत्येक पालक सहमत असेल.”

अभिषेकच्या कामाबाबत बोलायचं झालं तर, अभिषेक शेवटचा घूमर चित्रपटात दिसला होता.

Story img Loader