दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि सुपरस्टार रजनीकांत यांची लेक निर्माती ऐश्वर्या यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जानेवारी २०२२ मध्ये विभक्त होणार असल्याची माहिती दिली होती. यानंतर मध्यंतरी मुलांसाठी हे जोडपं पुन्हा एकत्र आल्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु, आता या जोडप्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.
इंडिया टुडेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऐश्वर्या आणि धनुष यांनी अलीकडेच चेन्नईच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. कलम १३ ब अंतर्गत त्यांचा हा घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोघांनी परपस्पर सहमतीने हा निर्णय घेतला असून या प्रकरणी काही दिवसांत सुनावणी करण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते वेगवेगळे राहत होते. यावर अद्याप या दोघांनीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ऐश्वर्या आणि धनुष यांना दोन मुलं आहेत. त्यामुळे घटस्फोटानंतर मुलांची कस्टडी कोणाकडे जाणार याबाबत कोर्टाच्या सुनावणीत स्पष्टता दिली जाणार आहे.
दरम्यान, दाक्षिणात्य अभिनेता धनुषने २०२२ मध्ये आपला १८ वर्षांचा संसार मोडत, पत्नी ऐश्वर्या रजनीकांतपासून वेगळं होण्याची घोषणा केली होती. त्याची पत्नी प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांची मुलगी आहे. ऐश्वर्या आणि धनुष यांचं २००४ मध्ये झालं होतं. त्यांना यात्रा आणि लिंगा अशी दोन मुलं आहेत.
सध्या धनुष आणि ऐश्वर्या आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत आहेत. ‘लाल सलाल’ या चित्रपटाचं दिग्दर्शन ऐश्वर्याने केलं होतं. तर लवकरच धनुष एका बॉलीवूड चित्रपटात झळकणार आहे.