अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी नीसा देवगणने फिल्मी दुनियेत पाऊल ठेवण्यापूर्वीच चर्चेत राहायला सुरुवात केली आहे.
नीसा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय असलेल्या स्टारकिड्सपैकी एक आहे. अनेकदा ती विविध पार्ट्यांमध्ये उपस्थित राहत असते. अनेकदा तिथे पार्ट्यांमधील बोल्ड फोटो व्हायरल होतात. तर या फोटोंमुळे तिला ट्रोलही करण्यात येतं. आता पुन्हा एकदा काही व्हायरल फोटोंमुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे.
नीसा अनेकदा तिचा मित्र ओरहान अवत्रमणीबरोबर पार्टी करताना दिसते. ओरहान एका व्यावसायिकाचा मुलगा आहे. ओरहान आणि नीसा एकमेकांचे खूप चांगले मित्र-मैत्रीण आहेत. अनेकदा ते एकत्र दिसतात. बऱ्याच पार्ट्यांमधील त्यांचे एकत्र फोटोदेखील चांगलेच व्हायरल होत असतात. तर आता त्यांनी नुकत्याच केलेल्या एका पार्टीदरम्यानचे त्यांचे बोल्ड फोटो चांगलेच चर्चेत आले आहेत.
ओरहान आणि नीसा नुकतेच त्यांच्या इतर मित्रमंडळींबरोबर लंडन येथे एका पार्टीमध्ये सहभागी झाले होते. या वेळचे अनेक फोटो ओरहानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले. एका फोटोमध्ये नीसा कारमध्ये बसली असून तिने स्टायलिस्ट काळ्या रंगाचा वन पीस परिधान केला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये नीसा आणि ओरहान एकत्र पोज देत आहेत. तर बाकी फोटोंमध्ये ते दोघं पार्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये नीसाच्या चेहऱ्याकडे पाहून तिने खूप दारू प्यायली असल्याचा अंदाज बांधत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
नीसाच्या या व्हायरल फोटोवर प्रतिक्रिया देत एकाने लिहिलं, “कायम नशेमध्ये राहण्याला ही लोक मजा म्हणतात.” तर आणखी एकाने लिहिलं, “जवानी का जोश है! हेच जर एखाद्या गरीब व्यक्तीने केलं तर त्याचं चारित्र्य खराब… आणि एखाद्या श्रीमंताने केलं तर ती मजा.” या व्हायरल फोटोंमुळे नीसा पुन्हा एकदा लक्ष्य झाली आहे.