बॉलीवूडचे कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चांचा भाग बनतात. कधी त्यांच्या वक्तव्यामुळे, कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे, तर कधी त्यांच्या चित्रपटांमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता अभिनेता अजय देवगण हा त्याच्या ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटामुळे चर्चांचा भाग बनला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१२ मध्ये ‘सन ऑफ सरदार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता विजय कुमार अरोडा यांच्या दिग्दर्शनाखाली या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाबाबत मोठी चर्चा असल्याचे पाहायला मिळत होते. आता या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून अजय देवगणने त्याची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अजय देवगणने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्याचा मुलगा युग आणि काही कलाकार मंडळी दिसत आहेत. अजय देवगणने डोक्यावर पगडी घातली असून अभिनेत्री मृणाल ठाकूर ढोल वाजवताना दिसत आहे. चाहत्यांनी अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा: Video: बायकोची माफी मागत प्रसाद ओकने ‘तो’ व्हिडीओ केला शेअर, स्वप्नील जोशी म्हणाला, “तुला भीती नाही का?”

२०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटात अजय देवगणबरोबर सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत दिसली होती, तर संजय दत्तदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. मात्र, या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये हे दोन्ही कलाकार दिसणार नाहीत. चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार असून संजय दत्तला युकेचा व्हिसा न मिळाल्याने अभिनेत्याच्या जागी रवी किशन दिसणार आहेत. हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. या तिघांशिवाय चित्रपटात विजय राज, चंकी पांडे, नीरू बाजवा, दीपक डोबरियाल, कुब्रा सैत, विदु दारा सिंह, मुकुल देव, शरत सक्सेना, रोशनी वालिया हे कलाकार दिसणार आहेत.

दरम्यान, अजय देवगण आणि तब्बूची मुख्य भूमिका असलेला “औरों में कहां दम था” हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर तो फारशी कमाई करू शकला नाही. आता ‘सन ऑफ सरदार’ हा चित्रपट प्रेक्षकांना भूरळ घालणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay devagan shares shooting started son of sardaar post on social media nsp