सिनेविश्वात अफेअर, लग्न आणि घटस्फोट या गोष्टी नवीन नाहीत. अनेक कलाकार बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर वेगळे झाले आणि अनेकांचे तर १५-२० वर्षांचे संसारही मोडले. एक बॉलीवूड अभिनेत्री अशीही आहे जी लग्नाआधीच गरोदर राहिली होती. गरोदर असल्याने तिने त्याच वर्षी बॉयफ्रेंडशी लग्न केलं. पण लग्नानंतर त्याचंं नातं फार काळ टिकलं नाही आणि ते वेगळे झाले. या अभिनेत्रीने अभिनयासोबतच दिग्दर्शनातही नशीब आजमावलं आणि तिच्या त्या कामाचंही खूप कौतुक झालं.
ही अभिनेत्री म्हणजे कोंकणा सेन शर्मा होय. कोंकणाने तिच्या करिअरमध्ये हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त बंगाली चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तिने दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि तीन फिल्मफेअर पुरस्कारही जिंकले आहेत. फिल्मी बॅकग्राउंड असलेल्या कोंकणाला ज्या चित्रपटात तिची भूमिका महत्त्वाची वाटते, तशाच भूमिका ती निवडते. आतापर्यंत तिने अनेक चित्रपट व वेब सीरिजमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
लग्नाआधीच गरोदर होती कोंकणा सेन
कोंकणा सेन शर्माने तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये नाव कमावलं आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या करिअरमध्ये तिने विविधांगी भूमिका साकारत तिचे अभिनय कौशल्य दाखवले. कोंकणाला तिच्या कामासाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. आताही ती इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रोफेशन लाईफमध्ये कोंकणा खूप यशस्वी आहे, पण तिचं वैयक्तिक आयुष्य चढ-उतारांनी भरलेलं राहिलं. २००७ मध्ये ती अभिनेता रणवीर शौरीला डेट करू लागली. एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, २०१० मध्ये कोंकणा लग्नाआधीच गरोदर राहिली होती. त्यानंतर त्याच वर्षी तिने व रणवीरने लग्न केले.

१० वर्षांचा संसार मोडला
कोंकणा व रणवीर २०११ मध्ये आई-बाबा झाले होते. त्यांना हारून नावाचा मुलगा आहे. कोंकणा व रणवीर यांचा प्रेम विवाह फार काळ टिकू शला नाही. २०१५ मध्ये रणवीर आणि कोंकणा वेगळे झाले आणि २०२० मध्ये दोघांनी अधिकृतपणे घटस्फोट घेतला. रणवीर आणि कोंकणा दोघेही मिळून हारूनला सांभाळतात.
कोंकणाने २०१० मध्ये आलेल्या ‘अतिथी तुम कब जाओगे’ या चित्रपटात अजय देवगणबरोबर काम केलं होते. याशिवाय अनेक हिट चित्रपटांमध्येही तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. अभिनेत्री झाल्यानंतर तिने ‘अ डेथ इन द गुंज’ या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं. कोंकणा उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच चांगली दिग्दर्शिकाही आहे. तिच्या कामाचे जगभरात चाहते आहेत.