बॉलीवूडमधील प्रसिद्ध ऑनस्क्रीन जोडी अजय देवगण आणि तब्बू हे ‘औरों में कहां दम था’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. याआधी या दोघांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, यावेळी असे घडताना दिसले नाही. अजय देवगण आणि तब्बू यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.

‘औरों में कहा दम था’ चित्रपटाने सोमवारी केली इतकी कमाई

आता ‘औरों में कहा दम था’ या चित्रपटाने ५ ऑगस्टला म्हणजेच सोमवारी केलेली कमाई ही फक्त १.०४ कोटी रुपये इतकी आहे. ही रक्कम जवळजवळ रविवारी केलेल्या कमाईपेक्षा ६२.१८ टक्क्यांनी कमी आहे. मात्र, सुधांशू सारीया दिग्दर्शित ‘उलझ’ या चित्रपटाची कमाई यापेक्षाही कमी आहे. ‘उलझ’ चित्रपटाने सोमवारी फक्त ५७ लाख रुपयांची कमाई केली आहे.

allu arjun starr Pushpa 2 The Rule movie box office collection day 61
ओटीटी रिलीजचा ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसच्या कमाईवर मोठा फटका, ६१व्या दिवशी फक्त ‘इतके’ कमावले
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Aditya Sarpotdar
मराठी चित्रपटांनी कमाईचे आकडे दाखवणे किती गरजेचे? ‘मुंज्या’चा मराठमोळा दिग्दर्शक म्हणाला, “वाईट सिनेमांचे…”
Junaid khan says he releasing film on youtube is best
थिएटर व OTT च्या वादावर आमिर खानचा मुलगा म्हणाला, “चित्रपट युट्यूबवर मोफत…”
Deva Advance Booking Day 1
शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग सुरू; पहिल्याच दिवशी केली ‘इतकी’ कमाई
Controversy About These Movies
Controversy : ‘छावा’च नव्हे ‘या’ चित्रपटांमधल्या दृश्यांवरही जोरदार आक्षेप; वादाचं ग्रहण लागलेले चित्रपट कुठले?
marathi actor shares his opinion on chhaava movie
“लहान तोंडी मोठा घास, पण…”, ‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याने व्यक्त केली ‘ती’ खंत; विकी कौशलबद्दल म्हणाला…
vaastav 2 sanjay dutt mahesh manjrekar
महेश मांजरेकरांच्या ‘वास्तव’चा २६ वर्षांनी येणार सिक्वेल? संजय दत्त सिनेमात दिसणार की नाही? वाचा…

समोर आलेल्या माहितीनुसार, ‘औरों में कहा दम था’ हा चित्रपट १०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला गेला आहे. या चित्रपटाने भारतात आतापर्यंत ७.७९ कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर जगभरात ९.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने प्रदर्शित झालेल्या दिवशी फक्त १.८५ कोटी रुपयांची कमाई केली होती. अजय देवगणच्या या चित्रपटाची १५ वर्षांतील ही सर्वात कमी ओपनिंग मानली जात आहे. नीरज पांड्ये यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘औरों में कहां दम था’ या चित्रपटाची अक्षय कुमारच्या ‘सरफिरा’ या चित्रपटापेक्षा वाईट सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा: “तू माझ्या आयुष्यात अशा वेळी आलीस…”, ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्याने होणारी बायको शिवानी सोनारसाठी लिहिली खास पोस्ट

या चित्रपटाबरोबरच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘उलझ’ या चित्रपटाकडेदेखील प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. ‘उलझ’ हा चित्रपट सुधांशू सारीया यांनी दिग्दर्शित केला असून जान्हवी कपूर, रोशन मॅथ्यू हे कलाकार प्रमुख भूमकेत दिसत आहेत.

दरम्यान, २ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या ‘औरों में कहां दम था’ या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू यांच्याशिवाय शांतनु माहेश्वरी, जिमी शेरगील आणि महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. ‘आरआरआर’ चित्रपटातील संगीत दिग्दर्शन केलेले एम. एम. किरवाणी यांनी या चित्रपटालादेखील म्युझिक दिग्दर्शन केले आहे. आता हा चित्रपट आणखी किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader