अजय देवगणच्या ‘दृश्यम २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. ‘दृश्यम २’ला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. आता अजयच्या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजयचा ‘भोला’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. आता या चित्रपटामधील अजयचा लूक समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Kuttey Trailer : शिवीगाळ, इंटिमेट सीन अन् तब्बूची एण्ट्री, अर्जून कपूरच्या ‘कुत्ते’चा ट्रेलर प्रदर्शित, संतोष जुवेकरचीही दिसली झलक

अजयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘भोला’मधील त्याचा लूक पाहायला मिळत आहे. अजयचा हा लूक खरंच अंगावर काटा आणणारा आहे. प्रेक्षकांनी कधीही न पाहिलेला अजयचा अवतार या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

अजयच्या कपाळी भस्म, भेदक नजर लक्ष वेधून घेणारी आहे. “एक चट्टान, सौ शैतान…” असं म्हणत अजयने हा व्हिडीओ शेअर केला आहे. चित्रपटातील त्याचा हा लूक पाहून प्रेक्षकांमध्ये ‘भोला’बाबत उत्सुकता वाढली आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये अजयचा संपूर्ण लूक दाखवण्यात आला नव्हता.

आणखी वाचा – राणादा-पाठकबाई हनिमूनला कुठे जाणार? हार्दिकने स्वतःच दिलं उत्तर, म्हणाला, “अजूनही आम्ही…”

आता त्याचा लूक पाहिल्यानंतर चाहते अजयचं कौतुक करत आहेत. हा चित्रपट सुपरहिट ठरणार असं प्रेक्षक अजयचा लूक पाहिल्यानंतर म्हणत आहेत. ‘भोला’ हा दाक्षिणात्या चित्रपट ‘कॅथी’चा हिंदी रिमेक आहे. पुढील वर्षी ३० मार्चला ‘भोला’ बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay devgan bhola movie first look out film release next year in march watch video kmd