अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगणने फिल्मी दुनियेत पाऊल ठेवण्यापूर्वीच चर्चेत राहायला सुरुवात केली आहे. न्यासा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय असलेल्या स्टारकिड्सपैकी एक आहे. अनेकदा ती तिच्या कृतीमुळे, तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे ट्रोल होत असते. तिला नेहमीच चाहूबाजूने ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आता अजय देवगणने लेकीला केल्या जाणाऱ्या ट्रोलबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजय सध्या त्याच्या आगामी ‘भोला’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत त्याला न्यासाला ट्रोल केलं जाण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ट्रोलिंगमुळे आपल्याला त्रास होता कामा नये हे तो त्याच्या मुलांना नेहमीच समजावत असतो, असं त्याने सांगितलं.

आणखी वाचा : “लोक वाईट बोलतात याचा अर्थ न्यासा…”; लेकीला ट्रोल केलं जाण्याबद्दल काजोलने सोडलं मौन

अजय म्हणाला, “मी माझ्या दोन्ही मुलांना नेहमी सांगत असतो की कोणत्याही ऑनलाईन लिहिल्या गेलेल्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. यामुळे तुम्हाला कधीही त्रास होता कामा नये. जेवढे तुमच्यावर प्रेम करणारे तुमचे फॅन्स असतात त्यापेक्षा अनेक पटीने कमी ट्रोल करणाऱ्यांची संख्या असते. मला समजत नाही की लोकांकडे इतकी नकारात्मकता कुठून येते. आता मी स्वतः त्याकडे दुर्लक्ष करायला शिकलो आहे आणि हेच मी माझ्या मुलांनाही करायला सांगतो.”

हेही वाचा : न्यासा देवगणच्या न्यू इअर सेलिब्रेशनचे ‘ते’ फोटो पाहून नेटकरी संतापले, म्हणाले “आई-वडिलांची अब्रू धुळीला…”

पुढे तो म्हणाला, “माझ्या मुलांकडे नेहमीच सर्वांचं लक्ष लागलेलं असतं आणि यामुळे मी त्रस्त असतो. मी या गोष्टींना किंवा ऑनलाईन होणाऱ्या ट्रोलिंगला बदलू शकत नाही. अनेकदा आपण कल्पनाही करू शकत नाही एवढं काही ते ट्रोलर्स लिहून जातात. पण काय करणार? यावर मी काही उत्तर दिलं तर परिस्थिती अजूनच बिघडेल.” आता अजयचं हे उत्तर खूप चर्चेत आलं आहे.