काजोल आणि अजय देवगण यांची जोडी बॉलीवूड मधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांचा दिलखुलासपणा आणि त्यांच्यातील असलेल्या बॉण्डिंग सर्वांनाच आवडतं. आता त्यांच्या लग्नाला २४ वर्षं होऊन गेली असली तरी त्यांच्यातली केमिस्ट्री आहे तशीच आहे. अनेकदा ते एकमेकांबद्दल आणि एकमेकांच्या कामांबद्दल भरभरून बोलत असतात. पण एकदा अजय देवगणचा किसिंग सीन पाहून काजोल खूप चिडली होती.
हा किस्सा ‘शिवाय’ या चित्रपटादरम्यानचा आहे. या चित्रपटात अजय देवगणने प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटातील एक किसिंग सीन चांगलाच चर्चेत आला होता. त्याआधी अजय देवगण नो किसिंग पॉलिसी फॉलो करत होता. परंतु या चित्रपटात त्याने किसिंग सीन दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
आणखी वाचा : Video: काजोल आणि तनिषाने मिळून आईला भेट दिला आलिशान बंगला, झलक पाहून व्हाल आवाक्
अजय देवगणच्या किसिंग सीनबद्दल कळल्यानंतर काजोल रागावली होती. अखेर अजयला तिची माफी मागावी लागली होती. एकदा कपिल शर्मा शो मध्ये सहभागी झाल्यावर काजोलने हा किस्सा सांगितला होता. “अजयला ऑनस्क्रीन किस करताना पाहिल्यावर तुझी प्रतिक्रिया कशी होती?” असं कपिलने तिला विचारल्यावर ती म्हणाली, ” मी त्या चित्रपटाची निर्माती होते तरीही मला या चित्रपटातील अजयच्या किसिंग सीनबद्दल सांगण्यात आलं नाही. नंतर त्याबद्दल अजयने माझी माफी मागितली. अजयने माझी माफी मागितल्यावर मी त्याला माफ केलं.”
हेही वाचा : “…तर आज ही वेळ आली नसती,” रात्री केलेल्या एका कृतीमुळे काजोल झाली ट्रोल
काजलने शेअर केलेला हा किस्सा खूप चर्चेत आला होता. तर अजयच्या आगामी चित्रपटांची यादी मोठी आहे. ‘मैदान’, ‘रेड २’, ‘गोलमाल ५’, ‘सिंघम ३’ अशा चित्रपटांमध्ये तो प्रमुख भूमिका करताना दिसणार आहे.