सोशल मीडिया असे माध्यम आहे की, ज्यावर सगळे जण आपल्या भावना खुलेपणाने व्यक्त करू शकतात. नामांकित व्यक्तीपासून ते सामान्य व्यक्तीपर्यंत सर्व जण या माध्यमाचा वापर करू शकतात. त्याबरोबरच जगातील कोणत्याही व्यक्तीबरोबर जोडले जाणे यामुळे सहज शक्य होते. याच माध्यमातून अनेकदा कौतुकाबरोबरच अनेकांना कोणत्या तरी बाबीवरून ट्रोल केले जाते. आता बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणलादेखील त्याच्या अभिनयावरून ट्रोल केले जात होते. मात्र, त्यावर अभिनेत्याच्या चाहत्यांनी ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला प्रत्युत्तर देत अजय देवगण हा चांगला कलाकार असल्याचे म्हटले आहे.

एका युजरने एक्स अकाउंटवर असे म्हटले होते की, अजय देवगण हा बॉलीवूडमधील वाईट अभिनेता आहे. त्याच्या पिढीतील तो सगळ्यात वाईट अभिनय करणारा कलाकार असून, त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नसतात. त्यामुळे अक्षय कुमार किंवा तिन्ही खान यांच्यासारखी लोकप्रियता अजय देवगणला मिळू शकली नाही, असे म्हटले आहे. नेटकऱ्याच्या या कमेटनंतर अजय देवगणच्या चाहत्यांनी त्याला चांगलेच सुनावले आहे.

bjp leader Kiren rijiju
“राहुल गांधी अजुनही अपरिपक्व नेते”, संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांची टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Abhishek Bachchan
अभिषेक बच्चनचं ‘ते’ वाक्य अन् अमिताभ बच्चन म्हणाले, “तुला शोमध्ये बोलवून चूक केली”; नेमकं काय घडलं?
Reshma Shinde
‘रंग माझा वेगळा’मध्ये सावळ्या मुलीला का घेतलं नाही? ‘अशी’ झालेली रेश्मा शिंदेची निवड; मालिकेच्या लेखकानं सांगितलं कारण
Maheep Kapoor gatecrashed Sanjay Kapoor party
‘वन नाईट स्टँड’साठी मद्यधुंद अवस्थेत पार्टीत शिरली, नशेतच त्याच्या कुटुंबाला…; कपूर कुटुंबाच्या सूनेने सांगितली लव्ह स्टोरी
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर
Aishwarya Rai reaction when was introduced as Aishwarya Rai Bachchan
“मी अभिषेक बच्चनशी…”, ‘ऐश्वर्या राय बच्चन’ अशी ओळख करून दिल्यावर अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य

अजय देवगणची बाजू घेताना एका चाहत्याने म्हटले, “तो चांगला अभिनय करतो. ‘दृश्यम’, ‘सिंघम’ व ‘शैतान’ या चित्रपटांत त्याचा अभिनय आवडला होता.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने अक्षय कुमारबरोबर तुलना करताना म्हटले आहे, “अजय देवगण हा अक्षय कुमारपेक्षा जास्त मोठा आहे. बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या चित्रपटांच्या आकड्याची तुलना कर. चार वेळा त्याने राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केला आहे. तो अभिनयाच्या बाबतीतदेखील इतरांपेक्षा वरचढ आहे. काही भूमिका सारख्या आहेत आणि त्यामुळे अभिनयसुद्धा सारखाच आहे. आणखी एका युजरने असे लिहिले आहे, “अजय देवगण एक उत्तम अभिनेता आहे. आजकालच्या मुलांना ते कळत नाही “. एका नेटकऱ्याने ट्रोल करणाऱ्याला उत्तर देताना म्हटले आहे की, कदाचित तू म्हणत आहेस ते खरे असेल. मात्र, अनेक भारतीय पुरुष त्यांच्या खऱ्या आयुष्यात तसेच असतात. त्यामुळे जेव्हा अजय देवगण चित्रपटात अभिनय करीत असतो तेव्हा अनेक जण त्याच्याबरोबर स्वत:ला जोडून घेतात.

फूल और काँटे या १९९१ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून अजय देवगणने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. ३० वर्षांच्या त्याच्या बॉलीवूडमधील प्रवासात त्याने एकापेक्षा एक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नुकताच तो ‘शैतान’ चित्रपटात दिसला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा ‘शैतान’ला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.